शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

आरक्षित जागांवर अतिक्रमण

By admin | Published: September 14, 2015 12:27 AM

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

भंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या सीटच्या मागे या जागा कुणासाठी राखीव याचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु बसचा वाहक या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने अंध, अपंगांसह महिला प्रवाशांना राखीव ऐवजी रांगेत उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये ठराविक सीट्स या राखीव आहेत. त्या सीटच्या मागे त्या कुणासाठी राखीव आहे. याचा उल्लेख आहे व ज्या सीटच्या मागे नमूद नसेल त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत, असे समजण्यात येत असते. राज्य परिवहन महामंडळातर्फे बसमध्ये उदात्त हेतूने जागा राखीव ठेवल्या असल्या तरी वाहकाद्वारा अंमलबजावणीच होत नसल्याने महामंडळाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. बसस्थानकावर बस येताच मिळेल ती जागा बळकावण्याची प्रवाशांची मानसिकता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आबालवृद्धांना डावलून तरुणतुर्क जागा मिळविण्यासाठी धडपड करतात. बसमध्ये खिडकीमधून रुमाल, दुपट्टा व कॅरीबॅग टाकून ती जागा जणू आरक्षित झाली या अविर्भावाने वावरतात. अंध, अपंग व महिलांना मात्र गर्दीतून वाट काढत जागा मिळविणे शक्य होत नाही. परिणामी महामंडळाद्वारा या प्रवाशांना त्यांची हक्काची जागा देणेदेखील कठीण होते. शासनाने विशेष सुविधा दिली असली तरी त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो, हेही तेवढेच सत्य आहे. याकडे शासनासह विभागीय नियंत्रकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)