लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेले टिन पत्रे, सिमेंट खांब, विटा, लाकडे आदी साहित्य जप्त केले. रस्त्यावरील जनवारांचे गोठे हटविण्यात आले.स्थानिक बाजार चौकातील अतिक्रमणाने बैलाच्या पोळा उत्साहाला अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतने तात्काळ लक्ष केंद्रीत करुन अतिक्रमण धारकांना नोटीस बजावूनही ज्या अतिक्रमण धारकांनी अतिक्रण काढले नाही. त्यांचे टिन पत्रे, सिमेंट खांब जप्ती केले तर गाव शिवारातील माळराण जागेवरील व स्मशानभूमीतील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार आहे.गावात मेंढपाळ व्यवसाय करणारे धनगर बांधवांचे ७० ते ८० कुटूंबाचे वास्तव्य आहे. त्यांचा शेळ्यामेंढ्या पाळण्याचा वडीलोपार्जित व्यवसाय आहे. परिसरातील जंगल व माळरानावर शेळ्या मेंढ्यासह अनेक वर्षापासून गुजरान करीत आहेत.लोकांच्या अतिक्रमण करण्याच्या वृत्तीमुळे गावाच्या परिसरातील खुली जागा उपलब्ध नाही. शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हशी पाळीव जनावरांना चारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना पाळीव जनावरे विकावी लागत आहेत. मोजक्याच धनगर समाजाकडे पाळीव प्राणी शिल्लक आहेत. त्यांना चकारा, येथील चकार टेकडी रस्त्यावरील पाझर तलावाशेजारील जागेत व स्मशानभूमी शेजारील ढोरफोडी जागेवर अतिक्रमण करुन जमीन गडप केली. दफन भूमितही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याने मृत जनावरे जागेअभावी दफनभूमितच फेकले जातात. धनगर बांधवांच्या पाळीव प्राण्यांसाठी चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर समस्या नुकत्याच झालेल्या १८ आॅगस्टच्या ग्रामसभेत स्मशानभूमी दफनभूमी व चकारा टेकडी परिसरातील अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतीचे अतिक्रमण काढण्याचा ठराव ग्रामवासीयांनी ग्रामसभेत घेतला. यावेळी ग्रामसभेत सरपंचा लोपमुद्रा वैरागडे यांनी अतिक्रमण केलेल्या जागेतील धानाचे पीक निघताच कुणाचीही गय न करता ते अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. समोर येणाऱ्या बैलाच्या पोळ्याला उत्साहाला अडचण निर्माण होत असतो. पंरतु काही अतिक्रमण धारक प्रत्येकच वर्षी नोटीस देवूनही अतिक्रमण काढत नाही. यावेळी ग्रामपचांयतने कुणाचीही हयगय न करता अतिक्रमण जागेतील साहित्य जप्त केले. कारवाईप्रसंगी सरपंचा लोपमुद्रा मनोज वैरागडे, उपसरपंचा मंजुषा जगतराम गभणे, निलेश काटेखाये, मोना तिभागेवार, वर्षा काटेखाये, दिनेश नंदपूरे, आशिष मेश्राम, शामलाल रामटेके, प्रदिप भुरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, ग्रामविकास अधिकारी धनराज बावनकुळे, रुपचंद उके आदी उपस्थित होते.बाजार चौकातील अतिक्रमणाने बैलाचा पोळा व बाजाराची डोकेदुखी वाढविली गत २० ते २५ वर्षापासून त्यांना नोटीस बजावूनही ग्रामपंचायत गेल्यावरच ते अतिक्रमण काढतात. त्यामुळे ज्यांनी नोटीस देवूनही अतिक्रमण काढले नाही. अशांची टिनपत्रे, सिमेंट खांब, लाकडे जप्ती केली आहे. त्यांचेवर दंड आकारुन त्यांना तंबी देण्याचे ग्रामपंचायतने निर्णय घेतला आहे.-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ
चिचाळच्या बाजार चौकातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:48 AM
पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेले टिन पत्रे, सिमेंट खांब, विटा, लाकडे आदी साहित्य जप्त केले.
ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : जप्त मालमत्तेचा ग्रामसभेत लिलाव