प्रकरण अड्याळ येथील : प्रवाशी निवारा भुईसपाट, पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नका अड्याळ : अड्याळ बसस्थानकावरील प्रवासी निवारा हा जीवघेणा ठरत असल्यामुळे हा निवारा पाडण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये बहुमताने घेण्यात आला. त्यानंतर आज गुरूवारला हा निवारा पाडण्यात आला. अतिक्रमणाच्या विषयाला धरून ग्रामस्थांनी शांती मोर्चा काढला होता. ‘गाव करी ते राव नाही करी’ या उक्तीचा प्रत्यय अड्याळ येथे गुरूवारला आला.भंडारा - पवनी मार्गावरील अड्याळ येथे अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून नाहक बळी जात होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकी करून अतिक्रमण मोहीम राबविण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये घेतला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाई होणार असल्यामुळे काही अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने आधीच हटविली होती. सध्या उन्हाचे दिवस आहेत यासाठी ग्रामपंचायतीने तात्पुरती प्रवासी निवाऱ्याची सोय व विद्यार्थी पासेसकरीता ग्रामपंचायत कार्यालयात वाहतूक नियंत्रकांना बसण्याची पर्यायी व्यवस्था करावी असे पत्र मंडळाकडून ग्रामपंचायतीला दिले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत उपअभियंता भगत व शाखा अभियंता गभने, बावनकुळे, मानवटकर, तांत्रिक सहायक सुपले, कनिष्ठ अभियंता गजभिये नायब तहसीलदार कांबळे, अड्याळचे ठाणेदार अजाबराव नेवारे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे व चमू उपस्थित होती. अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात सकाळी ११ पासून प्रवासी निवाऱ्यापासून झाली. ग्रा.पं.चाळीतील अतिक्रमण हटणारअतिक्रमणाचा फटका सर्वात दुकानदारांना बसला त्यात ग्रामपंचायती सहा भाडेकरूंनी पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. पाच दिवसात अतिक्रमण काढले नाही तर ते पाच हजार रूपये ग्रामपंचायतीच्या महसुलात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)
पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले
By admin | Published: May 06, 2016 12:52 AM