लोकमत वृत्ताची दखल :अड्याळ येथील वॉर्ड क्रमांक तीनचे प्रकरण विशाल रणदिवे अड्याळअनेक वर्षापासून अड्याळ येथील वॉर्ड क्र. ३ मधील बंडू खोब्रागडे यांनी राहत्या घरी भंगार व्यवसाय सुरु केला होता. एवढा वाढला की, त्या ठेवलेल्या भंगार वस्तुमुळे तिथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना त्याचा त्रास होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून अन्यायाला वाचा फोडली होती. याची दखल घेत पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.त्यातच तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना सुध्दा त्याचा त्रास रोजच होत होता. ह्या समस्येविषयी भंगार व्यवसायीकाला ग्रामस्थांनी शेजाऱ्यांनी अनेकदा विंनती केली असतानाही व्यवसाय चालकांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. नंतरचा एक उपाय म्हणून वॉर्डातील काही ग्रामस्थांनी याविषयीची लेखी तक्रार ग्रामपंचायतला दिली. सर्वानुमते रस्त्यावरील घराजवळील ठेवलेला भंगार सामान लवकर उचलण्याचे आदेश ग्रामपंचायतीने या आधी व्यवसायीकाला अनेकदा दिले असतनाही भंगार सामान रस्त्यावरच बळजबरीने ठेवल्यासारखाच होता यात काही शंका नाही. पंरतु जेव्हा ग्रामपंचायत आपल्या नियमावर आली तर आपला भंगार सामान कधीही उचलू शकते याची कल्पना सुध्दा त्या भंगार व्यवसायीकाला कदाचीत नसावी असेच वाटते. ग्रामपंचायत एवढी कठोर नियमावर बोट ठेवून हा भंगार सामान हटविणार म्हणून ग्रामस्थांनाही विश्वास वाटत नव्हता. हा भंगार सामान हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने एक बुलडोजर, २ ट्रक्टर व पाचसहा पोलिस कर्मचारी व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी, व्यवासायीक घरी नसतांना सुध्दा तेथील अतिक्रमण शांततेत काढण्यात आले.या आधी दोन तीनदा चारदा याविषयी पत्रव्यवहार केला परंतू त्याचा काहीही परिणाम व्यावसायीकावर झाला नाही. अतिक्रमण काढण्याआधी रस्ता पाच सहा फुट होता. काढल्यानंरत ११ ते १२ फुट झाला रस्ता मोकळा झाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.ग्रामपंचायतीने जप्त केलेला भंगार सामान ३ नोव्हेंबर रोजी पर्यंत जर व्यवसायीकाने १४,५०० रुपये भरले नाही तर विक्री होणार होता. आता पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही की होणार हाही एक प्रश्नच आहे. परंतु व्यवसाय चालक हजर नसताना हा अतिक्रमण काढला तो कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहे याचीही चर्चा सध्या गावात रंगत आहे. जर का गैरकायदेशीर असेल तर ग्रामपंचायत काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन
By admin | Published: November 04, 2016 12:53 AM