आॅनलाईन लोकमतभंडारा : पोलिसांनी नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भागात जावून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. गुन्हेगारांना भिती वाटली पाहिजे, असा जरब निर्माण केला पाहिजे तर नागरिकांना मित्रत्वाची वागणूक द्या. चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस विभाग दोषी ठरेल, अशी कोणतीही कामे करू नका, असा सूचनावजा इशारा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी कायदा व सुव्यवस्था, नक्षलग्रस्त क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी ना.केसरकर हे रविवारला भंडाºयात आले होते. पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य सभागृहात आयोजित बैठकीत पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, गोंदियाचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, गोंदियाचे पालीस अधिक्षक दिलीप भुजबळ उपस्थित होते.पोलीस गृहनिर्माणबाबतचा आढावा घेताना ना.केसरकर म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासासाठी नवीन इमारती बांधण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वेगळा उपशीर्ष तयार करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकाºयांनी याबाबत अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेऊन त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यात. त्याप्रकारे नियोजन करून प्रस्ताव सादर करावा. जिथे नवीन पोलीस ठाणे होणार आहे, तिथे राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कुटूंबाची व त्यांच्या पाल्यांची सुविधा लक्षात घेऊन त्यांना पाहिजे तिथे निवासाची सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जुना जिल्हा असल्यामुळे येथील पोलिसांच्या जीर्न झालेल्या सदनिकांची दुरूस्ती करण्यात येईल, असे सांगितले.भंडारा पोलीस विभागाने अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. पोलिसांची प्रतिमा चांगली उंचावली पाहिजे यासाठी लोकांशी मित्रत्वाची वागणूक दिली पाहिजे. पोलीस विभागाने दारूबंदी व अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील पोलीस निवासस्थान, पदे, पोलिसांची रिक्त पदे, पोलीस ठाणे, फिरते व मोबाईल पोलीस ठाणे, गुन्हे प्रकरणे, अवैध दारुविक्री, रेती तस्करी प्रकरण, बाल व महिला अत्याचार प्रकरण, गोसेखुर्द प्रकल्पाची सुरक्षा, नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था, मिशन संभव, विकास व शांती सप्ताह, शहरातील वाहतूक, सायबर क्राईम, सीसीटिव्ही कॅमेरे, जनावरांची अवैध वाहतूक, पोलीस वाहन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कायदा व सुव्यवस्था आदींचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू व गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप भूजबळ यांनी पोलीस विभागाची माहिती पॉवर प्रेझेंटेशनने सादर केली. संचालन पोलीस उपअधीक्षक एस.व्ही. कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.छोटे पोलीस ठाणे स्थापन करण्याचा मानसगोंदिया हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. पोलिसांनी आदिवासीबहुल भागात जावून नागरिकांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवावे व जनजागृती करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. नक्षलग्रस्त भागात छोटे पोलीस ठाणे स्थापन करण्याचा मानस आहे. पोलिसांच्या निवास, आरोग्यावर निधीची कमतरता पडू देणार नाही . जिल्हा वार्षिक योजनेतून या क्षेत्रासाठी भरीव मदत करण्यात येणार आहे. वाहनाविषयी आढावा घेतांना म्हणाले, आधी तांत्रिक बाबी तपासा नंतर प्रस्ताव सादर करा. सॅटेलाईट फोन नक्षलग्रस्त भागात उपयोगी आहे. ज्यामुळे संवाद सोईचे होते. घनदाट जंगलात त्याचा फायदा होतो. नक्षलवाद कसा रोखता येईल यासाठी त्या भागातील आदिवासी समाजात जनजागृती करावी.
गुन्हेगारांवर जरब बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:41 PM
पोलिसांनी नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भागात जावून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.
ठळक मुद्देगृहराज्यमंत्री केसरकर : कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा