उपेक्षा कायम : शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे. तेव्हा कोठे आपला भारत देशातील शहरे स्मार्ट होऊ शकतील. कारण शेतकरी हा आपला देशाचा पाठीचा कणा आहे. शेतकरीच हा भारताला स्मार्ट बनवू शकतो. त्यासाठी शेतकरी विचाराचे नेते पदावर आले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या की होतील. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाने प्रत्येक गावात शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे. देशातील ८० टक्के मतदार शेतकरी, भारताची दिशा व नशिब बदलवून दाखवू शकतील तरच भारत स्मार्ट देश बनू शकतो. ६५ वर्षानंतर यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तीन पटीने वाढल्या आहेत. जर अन्न पिकविणारे शेतकरी दु:खी राहतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. उपरोक्त माहिती शासनाला कळविण्यात यावे जेणे करून कष्टकरी शेतकऱ्यांवर शासन योग्य विचार करू शकेल असेही निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
कष्टकरी शेतकऱ्यांना सक्षम बनवा
By admin | Published: May 28, 2015 12:35 AM