लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस १० जून रोजी उत्साहात साजरा करून नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम सकाळी १०.१० मिनिटांनी राकाँ प्रदेशाध्यक्ष धनंजय दलाल यांच्या हस्ते राकाँ पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य नरेश डहारे, डॉ.जगदीश निंबार्ते, प्रभात गुप्ता, विनयमोहन पशिने, डॉ.रविंद्र वानखेडे, रामलाल चौधरी, गुणवंत काळबांडे, नरेंद्र झंझाड, डॉ.श्रीकांत वैरागडे, शेखर गभणे, लोकेश खोब्रागडे, राजेश मते, उत्तम कळपाते, शरद मेश्राम, प्रा.बबन मेश्राम, राहुल वाघमारे, महेंद्र बारापात्रे, भानुदास बनकर, अरुण अंबादे, दादाराम अतकरीसह राकाँ पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर सभेला मार्गदर्शन करताना धनंजय दलाल यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोमाने व निष्ठेने कार्य करून जनतेच्या आशीर्वादाने राकाँ पक्षाचे मधुकर कुकडे यांना भरघोस मताने निवडून आणलेत, त्या सर्वांचे जाहीर आभार मानून कार्यकर्त्यांनी पुढे सुद्धा प्रामाणिकपणे एकनिष्ठेने प्रफुल्ल पटेल यांच्या सोबतीने कार्य करावे असा सल्ला दिला.याप्रसंगी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राजू सार्वे, अरुण गोंडाणे, दिनेश देशकर, दयानंद नखाते, गणेश बनेवार, नरेश येवले, महेश जगनाडे, अंकीत सार्वे, बाळू सतदेवे, अनिल कळंबे, अविनाश लिमजे, नत्थू बांते, हिरामण साठवणे, शामदेव निमजे, विष्णू कडीखाये, हेमंत महाकाळकर, तुकाराम हातझोडे, मुकेश कटरे, राहुल पारधी यांनी पक्ष बांधणी व विविध विषयांवर चर्चा करून मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राकाँ सेवादल जिल्हाध्यक्ष सुनिल शहारे यांनी केले. संचालनप्रा.एन.आर. राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन बबन मेश्राम यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:26 PM
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस १० जून रोजी उत्साहात साजरा करून नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी १०.१० मिनिटांनी राकाँ प्रदेशाध्यक्ष धनंजय दलाल यांच्या हस्ते राकाँ पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ठळक मुद्देनवनिर्वाचित खासदारांचा सत्कार: कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती