शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

'त्या' पाटबंधारे वसाहतीची ग्रामपंचायतीमध्ये नोंद

By admin | Published: June 16, 2016 12:57 AM

चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित वास्तु बांधकामात अडथळा ठरत असल्याचे कारणावरून पाटबंधारे विभागाची वसाहत भुईसपाट करण्यात आली.

भुईसपाट प्रकरण अंगलट येणार : आरोग्य विभाग व कंत्राटदारांच्या अडचणीत वाढचुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित वास्तु बांधकामात अडथळा ठरत असल्याचे कारणावरून पाटबंधारे विभागाची वसाहत भुईसपाट करण्यात आली. या वसाहतीची ग्रामपंचायतीमध्ये नोंद असल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा व कंत्राटदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.चुल्हाड येथे झुडपी जंगल अशी नोंद असणाऱ्या ०.९९ आर जागेत प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मित वास्तुचे बांधकाम मंजुर करण्यात आले आहे. या जागेचा वन हक्क कायद्यांतर्गत मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. याच झुडपी जंगल जागेत सन १९९४ मध्ये पाटबंधारे विभागाने 'अमिन' या कर्मचाऱ्यासाठी वसाहतीचे बांधकाम केले आहे. परंतु या इमारतीची वने व महसूल विभागाच्या दस्तऐवजात नोंद करण्यात आली नाही. यामुळे आरोग्य विभाग व कंत्राटदाराला जागेचे दस्तऐवज उपलब्ध करताना पाटबंधारे विभागाची इमारत असल्याचे दिसून आली नाही. परंतु आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकामास सुरूवात करताना आरोग्य विभागाची यंत्रणा व कंत्राटदाराला हस्तांतरीत जागेत पाटबंधारे विभागाची वसाहत असल्याचे दिसून आले असता इमारत कुण्याच्या मालकीची असल्याची शहनिशा करण्यात आली नाही. या इमारतसंदर्भात ग्राम पंचायतला साधी लिखित सुचना आरोग्य विभाग व कंत्राटदाराने दिली नाही. पाटबंधारे विभागाची वसाहत भुईसपाट करताना ग्रामपंचायतला पूर्व परवानगी देणारे पत्र देण्यात आले नाही. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेला साधी विचारपूस करण्यात आली नाही. वसाहत राखीव ठेवल्यास आरोग्य केंद्राची नवनिर्मित वास्तुचे बांधकाम प्रभावित ठरू शकत असल्याने वसाहत भुईसपाट करण्यात आली आहे.या पाटबंधारे विभागाच्या वासाहतीची ग्राम पंचायतीच्या नमुना आठ मध्ये सन १९९४ मध्ये नोंद असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय याच कालावधीत ठरावात नोंद करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा व कंत्राटदारांनी पाटबंधारे विभागाची वसाहत नवनिर्मित वास्तु उभारणीचे कामात अडथळा ठरत असल्याचे कारणावरून भुईसपाट केली आहे. या प्रकरणात पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांनी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये ४ एप्रिलला फौजदारी कारवाई व चौकशी करिता रितसर तक्रार दिली आहे. परंतु तब्बल दोन महिन्यानंतरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले नाही. या शिवाय वसाहत भुईसपाट प्रकरणात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी २७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन दोषी विरोधात कारवाई करण्याचे नमूद केले आहे. या प्रकणात पाटबंधारे विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्रात आरोग्य केंद्राचे वादग्रस्त बांधकाम थांबविण्याचे नमूद केले असताना तुर्तास स्थगती देण्यात आली नाही. आरोग्य विभागाची यंत्रणा व कंत्राटदाराने बांधकाम सुरूच ठेवले आहे. (वार्ताहर)दोन महिन्यांपासून कागदी घोड्यांचा प्रवासवसाहत भुईसपाट प्रकरणात आरोग्य व पाटबंधारे विभागाचे कागदी घोडे नाचविले जात आहे. आरोग्य विभागाने जागा हस्तांतरणाचे पत्र पोलिसांना दिले आहे तर, पाटबंधारे विभागाने वसाहत असल्याचे ग्रामपंचायतमध्ये नोंद असणारे पत्र दिले आहे. नाचणारे कागदी घोडे पोलीस स्टेशनमध्ये शांत होत आहे. एका फाईलमध्ये बांधली जात आहेत. परंतु चौकशी व फौजदारी कारवाई करीता पुढाकार घेण्यात येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याची एकच माहिती दिली जात आहे.कायद्याला लवचिकता का?सामान्य व्यक्तीने संपत्तीची नासधूस केली असती तर जलद गतीने फौजदारी कारवाई झाली असती. परंतु कायदा समान असताना वसाहत भुईसपाट करण्यात आली, असे असताना फौजदारी गुन्हे दाखल करण्यास विलंब लावण्यात येत आहे. यामुळे कायद्याला लवचिकता का, असा सूर सिहोरा परिसरात आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी तक्रारकर्त्याना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. सध्या या प्रकरणाची मोठ्या चवीने चर्चा होत आहे.