शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

पर्यावरण संवर्धन: या गावात अंघोळीसाठी ग्रामपंचायत देते माेफत गरम पाणी, साेलर पॅनलचा प्रभावी वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:37 AM

Environmental Conservation: संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने आता वृक्षताेड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला.

- चंदन माेटघरेलाखनी (भंडारा) : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने आता वृक्षताेड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी ६ वाजल्यापासून गावकऱ्यांना माेफत गरम पाणी पुरविले जात आहे. आठवड्याभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गावातील १२० कुटुंब घेत असून संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाची चर्चा आहे.

लाखनी तालुक्यातील रेंगेपार ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. ग्रामपंचायतीला २०११ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे राज्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले हाेते. तसेच स्मारक ग्राम याेजनेचे बक्षीसही मिळाले आहे. लहान माेठे अनेक पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकाविले आहे. पर्यावरण संवर्धनसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १०० एकर परिसरात वृक्ष लागवड केली आहे.  थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठी अतिरिक्त सरपण लागते. त्यासाठी वृक्षतोड हाेऊ नये म्हणून आता ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. सरपंच मनाेहर बाेरकर यांच्या पुढाकाराने साेलर वाॅटर हिटर सयंत्र लावण्यात आले आहे. त्यासाठी दाेन लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक एच. व्ही. लंजे यांनी दिली. 

गावकऱ्यांना नळ याेजनेद्वारे मुबलक पाणी दिले जाते. गरम पाणी पुरविण्याची कल्पना त्यातूनच आली. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून साैर उर्जेद्वारे गरम पाणी गावकऱ्यांना दिले जाते. सकाळी अंघाेळ करून ग्रामस्थांनी आपल्या कामाला निघावे. हा यामागचा उद्देश आहे.    - मनाेहर बाेरकर, सरपंच रेंगेपार काेहळी

गावासाठी एकच सौर हीटर nदीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे आहे. साेलर पॅनलद्वारे पाणी गरम हाेते. सकाळी ६ वाजल्यापासून १२० कुटुंबाना गरम पाणी माेफत दिले जाते. यासाठी काेणताही माेबदला घेतला जात नाही. nगृहकर व पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे.रेंगेपार काेहळी गावाची लाेकसंख्या १८७९ असून १२० कुटुंब येथे राहतात. संपूर्ण गावकऱ्यांचा या उपक्रमात सहभाग आहे.

सकाळपासून गरम पाण्यासाठी गर्दीगरम पाणी तेही माेफत मिळत असल्याने सकाळपासूनच रेंगेपार येथील नागरिकांची गर्दी हाेते. ग्रामपंचायतीच्या परिसरात लावलेल्या या सयंत्रातून गरम पाणी नेण्यासाठी महिला पुरुष गर्दी करून असतात. सकाळी ६ ते १० असे चार तास गरम पाणी दिले जाते.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत