* ठाणेदार नितीन चिंचोलकर
*तुमसर : पर्यावरणपूरक बीज राखी ही संकल्पना नावीन्यपूर्ण असून सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीला प्रेरणा देणारी आहे. राखीमध्ये असलेले विविध प्रकारचे बीज हे ज्यावेळेस पृथ्वीत जाऊन वृक्ष धारणा करेल त्यावेळेस ते अप्रतिम वाटेल अशा प्रकारची संकल्पना ज्यामुळे राखीचा उपयोग हे वृक्षलागवडीकरिता व बीजारोपण करण्याकरिता होणार हे खूप प्रेरणादायी असल्याचे मत ठाणेदार नितीन चिंचोळकर यांनी व्यक्त केले.
हितेंजु बहुद्देशीय संस्था तुमसर आणि महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन तुमसर येथे रक्षाबंधनानिमित्त पर्यावरणपूरक बीज राखी पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना बांधून साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस स्टेशन तुमसरचे नवीन पदभार सांभाळलेले पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बीच राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मीरा भट्ट, अर्चना डुंबरे, हितेंजु संस्थेच्या अध्यक्षा विना सांगोडे, सुनीता पांडे, आचल मेश्राम, राजेश्वरी लांजेवार, लीना निमजे, सुषमा कापगते, मंगला नाकाडे उपस्थित होते.