लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील खुटसावरी टोली येथील १२ कुटूंबाच्या घरची विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजेवर चालणारे अनेक उपकरणे जळाली. काही उपकरणे निकामी झाली आहे. याला कारणीभूत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी असल्याचा आरोप करुन याबाबत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.खुटसावरी टोली येथील रोहित्रातून शनिवारला रात्री १२.३० वाजता मोठा उजेड दिसून आला. नागरिकांनी रोहित्राकडे धाव घेतली असता तेथे स्पार्किंग होताना दिसले. क्षणातच रोहित्राने पेट घेतला. नागरिकांना ती आग पाण्याने विझविली.१२ कुटूंबाच्या घरी विजेवर चालणारी उपकरणे अचानक विद्युत दाब वाढल्याने निकामी झाले. यात त्या प्रत्येक कुटूंबीयांचे १० ते १५ हजार रूपयांचे नुकसान झाले. उच्च वीज दाबामुळे उपकरणे निकामी होत असल्याचे दिसताच टोलीवासीयांनी अख्खी रात्र डासांच्या प्रादूर्भावात जागून काढली.रामप्रसाद राऊत, निर्धन कडव, भगवान कडव, मोरेश्वर वघारे, अमृत भूते, रतिराम सोनवाने आदींच्या घरचे कुलर, पंखे, लाईट, चार्जर, केबल बॉक्स आदी विद्युतवर चालणारी उपकरणे जळाली. या प्रकाराला विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करून नुकसान भरपाईची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
उच्च वीज दाबामुळे उपकरणे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:07 PM
तालुक्यातील खुटसावरी टोली येथील १२ कुटूंबाच्या घरची विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजेवर चालणारे अनेक उपकरणे जळाली. काही उपकरणे निकामी झाली आहे. याला कारणीभूत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी असल्याचा आरोप करुन याबाबत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ठळक मुद्देखुटसावरीतील घटना : १२ घरचे फ्रीज, कुलर, पंख्यासह विद्युत उपकरणांचा समावेश