शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 9:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेच प्रकल्पाचे पाणी शेतीला वेळेवर मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नागपूर महानगर पालिकेला २०११ मध्ये वाढवून दिल्याने ...

ठळक मुद्देचरण वाघमारे : पेंच प्रकल्पाच्या पाण्यासाठी पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेच प्रकल्पाचे पाणी शेतीला वेळेवर मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नागपूर महानगर पालिकेला २०११ मध्ये वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा घणाघाती आरोप आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रकल्पचे पाणी मिळत नाही. यासाठी ठिकठिकाणी आंदोलन व रास्ता रोको करून अधिकारी व प्रशासनाला वेठीस धरण्यात येत आहे. पण यामुळे समस्या सुटणार नसून काही ठराविक राजकारण्यांचे फावणार आहे. शेतकºयांना पाणी मिळत नाही ही समस्या अनेक वर्षांपासून जैसी थे आहे. याला कारण म्हणजे २०१० मध्ये मध्यप्रदेश शासनाने बांधलेले चौराई धरण आहे. हे धरण तयार करताना जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्याला शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन पूर्वीच्या सरकारने केले नाही.मोहाडी व भंडारा तालुक्यातील ३० हजार हेक्टर शेतजमीन ही नागपूर पेंचच्या पाण्यावर अवलंबून आहे. या प्रकल्पाचे पाणी नागपूर महानगर पालिकेला देण्यात येते. २०११ पूर्वी महानगर पालिकेला ७८ एमएम क्यूब देण्यात येत होते. २०११ साली पाणी वाढवून १९० एमएम क्यूब देण्याचा करार करण्यात आला. प्रकल्पाची क्षमता कमी आणि नागपूरला देण्यात येणारे पाणी जास्त अशी अवस्था झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेतकरी हे वरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शेतकºयांना पाणी पुरवण्याचा करार असूनही वेळेवर पाणी मिळत नाही. याला मुख्य कारण म्हणजे पाण्याचे नियोजन न करणे आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने ११०० कोटी रुपयाचे नियोजन शेतकऱ्यांसाठी केले आहे. हत्तीडोई जंकशनवर सोलरवर चालणारी लिफ्ट आणि लिफ्ट सोलर चालणारी सूर नदीवर बंधारा व काटी वितरिकेवर लिफ्ट असे विविध कामाचे निरीक्षण सुरु आहे. दोन वर्षात शेतकºयांना नियमित व मुबलक पाणी सिंचनासाठी मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हे काम पूर्णत्वास आल्यास ६ किमी पर्यंत बॅक वॉटर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी वरठी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे व ग्राम पंचायत सदस्य संदीप बोंद्रे उपस्थित होते.आंदोलनानंतर पाणी कुठून आले ?पेंच प्रकल्पात पाण्याचा साठा मुबलक आहे. दोन महिन्यांपासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहेत. मागणी केल्यावर पाणी दिले असते तर शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची आवश्यकता पडली नसती. पाणी असून पाणी न सोडता आंदोलन केल्यावर पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देणे ही अधिकाºयांची बदमाशी आहे. आंदोलन झाल्यावर धरणात पाणी आले कुठून? असा प्रतिप्रश्न उपस्थित केलो. जर पाणी आहे तर वेळेवर दिले नाही म्हणून अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.