लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सोमवारी भंडारा तालुक्यातील मकरधोकडा येथील इथेनॉल व सीएनजी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होेते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, जे.बी. संगीतराव, कार्यकारी अभियंता डी.एम. नंदनवार, तहसीलदार अक्षय पोयाम, बीपीसीएलचे संजीव पोळ उपस्थित होते. भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मिती प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मकरधोकडा येथील जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करून ती जमीन प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला आहे.धानाचे तणस यापुढे शेतकऱ्यांनी जाळू नये, असे आवाहन करत पालकमंत्री डॉ. फुके म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दोन ते तीन लाख टन तणस या प्रकल्पासाठी लागणार आहे. त्यातून शेतकºयांना हेक्टरी सात ते आठ हजार रूपये मोबदला मिळू शकतो.हा प्रकल्प दीड हजार कोटींचा असून शंभर एकर जमीन लागणार आहे. यासाठी सर्व सहकार्य एमआयडीसी करणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम भारत उपलब्ध करुन देणार आहे. शेल व प्राज टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन इतरही कृषी व वने यातून उत्पन्न होणाºया वेष्टपासून इथेनॉल निर्मिती केल्यास इथेनॉल कमी किंमतीत उपलब्ध होईल असे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.तरुणांना रोजगार मिळणारधानापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचे देशात १२ प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी चार प्रकल्प कार्यान्वीत होत आहे. या प्रकल्पास जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यात तीन लाख ८४ टन आणि गोंदिया जिल्ह्यात तीन लाख ४६ लाख टन तणस उपलब्ध आहे. इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. तणस बांधणी करणे, मशीनच्या सहायाने होणार असून त्या अनुषंगाने उद्योग उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १५ हजार तरूणांना रोजगार प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
तणसापासून इथेनॉल व सीएनजी प्रकल्प दोन वर्षात सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:30 PM
तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठळक मुद्देपरिणय फुके : मकरधोकडा येथे जागेची पाहणी