रंजना श्रृंगारपुरे यांचे प्रतिपादन : आर.एम. पटेल महिला कला महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनभंडारा : पाण्याचा एक एक थेंब जसा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे लोकशाही प्रधान भारत देशामध्ये आपल्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकार म्हणजेच आपले अमुल्य मत तितकेच महत्वाचे आहे. तसेच ते बजावणे हे आपले नैतिक कर्तव्य सुध्दा आहे. एकुणच अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रंजना श्रृंगारपुरे यांनी केले.स्थानिक आर एम पटेल महिला कला महाविद्यालयात आज (बुधवारी) आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यकमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राजू आगलावे तसेच रासेयोे कार्यक्रम अधिकारी प्रा.किशोरदत्त पाखमोडे, शारिरीक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बोरकर, प्रा.राजकुमार उक े आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थींनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून विद्यार्थींनी स्वागत केले.श्रृंगारपुरे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकार हा फक्त एक राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीचाच अधिकार नाही. तर राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत मोलाची भुमिका बजाविणारा आहे. म्हणून तो आपला अधिकारच नाही तर नैतिक कर्तव्य सुध्दा आहे. ‘चलते रहने से ही सफलता है, नही तो रूका हुआ पाणी भी बेकार है,’ या ओळीव्दारे त्यांनी उपस्थित विद्यार्थींनीना संदेश दिला. तसेच महिलांना मिळालेल्या ५० टक्कयाच्या आरक्षणावरच न राहता पुढे जास्त टक्केवारीत कसे जावू हे आजच्या दिनातून सांगितले. म्हणजेच आपल्या देशाचा नागरिक हा मतदारच नाही तर मतदार राजा बनला आहे असे मार्गदर्शन केले.आगलावे म्हणाले, स्वतंत्रा, समता, बंधुता व सामाजिक न्याय या तत्वावर भारताची लोकशाही प्रणाली आधारलेली आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. म्हणजेच विविध जाती, धर्म, प्रांताचे लोक राहतात. आपण सर्व एका राष्ट्राचे नागरिक आहोत, राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ ला पार पडली. तेव्हा पासून नागरिक मतदार राजा बनला आहे. सर्वप्रथम २१ वर्ष पुर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क बहाल करण्यात येत होता. त्यांनतर गरजेनुसार संविधानात(घटनेत)बदल करण्यात आला व २१ वर्षावरून तो अधिकार १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर बहाल करण्यात आला. मिळालेल्या अधिकारातून आज देशामध्ये झालेले परिवर्तन पाहता मतदार जागृत झाल्याचे दिसून येते. पुढेही प्रत्येकांनी आपल्याला मिळालेला अधिकार कर्तव्य म्हणून बजावला तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये अधिक वाढ होईल असा आशावाद व्यक्त करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. संचालन व प्रास्ताविक प्रा.किशोरदत्त पाखमोडे यांनी तर आभार मेघा मेंढवाडे या विद्यार्थींनी मानले. (प्रतिनिधी)
‘मतदान’ नागरिकांचे नैतिक कर्तव्य
By admin | Published: January 26, 2017 12:54 AM