लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.शहरालगत वैनगंगेची विस्तीर्ण असे पात्र असून अनेक रेती घाटातून पांढरीशुभ्र रेती निघते. या घाटांच्या लिलावामध्ये स्थगनादेश मिळाला आहे. परिणाम अवैधरित्या रेतीचा उपसा करून तो विकण्याचा सपाटा तालुक्यात रेती चोरांनी लगावला आहे. रेती घाटातून पोकलँड मशिनने रेतीचा उपसा होत आहे.खड्यात पाणी साचले असल्यामुळे पादचारी व दुचाकी धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात उन्हाळी सुट्यानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने शाळेत जावे लागत असताना अवैध रेती वाहतुक करणारे ट्रक सुसाट वेगाने रोडवरून् धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातून होणारी अवैध रेती तस्करी बंद व्हावी या साठी तामवासवाडी, बाम्हणीसह सितेपार व परिसरातील नागरिकांनी महसूल विभागात तक्रारी केल्या. परंतू अजुनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिक संतापले आहेत.रेती चोर किंवा तस्कर हे विशिष्ट पक्षाशी सल्याशी असून निडणूक किंवा आदी कार्यक्रमात आर्थिक मदत पुरवित असल्याने लोकप्रतिनिधींचे त्यांना राजाश्रय मिळत असल्याने कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाºयाचा पोन खणखणल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रेती चोरांशी सुयोग्य असे अर्थकारण जुळवून घेतलेले आहे. परिणामी तक्रार होवूनही तामसवाडी, बम्हणी येथून रेती चोरी सुरूच आहे. या अर्थकारणामुळे भविष्यात किती बालकांना आपले जीव अपघातात गमवावे लागार हे येणारा काळच सांगेल. या अवैध वाहतुकीचे या अगोदरही जिल्ह्यात बळी गेलेले आहेत हे मात्र विशेष.रेती खननामुळे नदीपात्र धोक्यातपावसामुळे तालुक्यातील तामसवाडी व बाम्हणी रेती घाटातून अवैधरित्या नदीत पोकलँड मशिनने रेतीचा उपसा करून नदी किनाऱ्याजवळ तिची साठवणूक करून रात्री अपरात्रीला तर सोडाच दिवसा ढवळ्या विक्री केली जात आहे. आधीच गावातून जड वाहन जात असल्याने रत्याने पुर्णत: चालणे कठीण झाले आहे. तसेच नदी पात्रातून रेतीची पोकलॅण्डद्वारे खनन केले जात असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे.
तक्रार देऊनही रेतीचोरी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:32 PM
तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देतामसवाडीतील प्रकार : अपघाताच्या संभाव्य धोक्यामुळे झाल्या तक्रारी