लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :आधारभुत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तब्बल महिनाभरापासून धान विकूनही पैसे ऑनलाईन खात्यात जमा न झाल्याने शेतकरी सुमार संकटात सापडलेला आहे. आर्थिक घडी विस्कळीत होत ,शेतकरी विवंचनेत सापडलेला आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष देत नसल्याने विक्री केलेल्या धानाचा पैसा शासनावर बाकी आहे.
पालांदूर येथील धान खरेदी केंद्रावर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदीला प्रारंभ झालेला आहे. पाच डिसेंबर पर्यंत 16 हजार 393 क्विंटल धानाची खरेदी ५६५ शेतकऱ्या कडून करण्यात आलेली आहे. ही रक्कम तीन करोड रुपयांच्या पुढे असून शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपये आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शासन स्तरावरून या गोष्टीचा निश्चितपणे पाठपुरावा होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र लोकप्रतिनिधी कर्तव्यात कमी पडत असल्याने शेतकरी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शेती केल्याशिवाय पर्याय नाही. अशा विवंचनेत धान महिनाभर आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकून तब्बल महिना लोटला तरी रक्कम आलेली नाही. मात्र सर्व व्यवहार त्याला नगदीवर करावी लागतात. शासनाच्या वतीने शून्य दरात पुरविलेल्या पिक कर्ज सुद्धा अपुरा पडलेला आहे. शेती कर्जाशिवाय कसणे अशक्य आहे. एवढे जाणूनही शेतकऱ्याप्रती आपुलकी दिसत नाही.
अगदी लवकरच शेतकरी वर्गांचे धान खरेदी चे पेमेंट करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने तयारी सुरू झालेली आहे.
गणेश खर्चे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूर अंतर्गत धान खरेदी सुरळीत सुरू आहे. दररोज धान खरेदी ची ऑनलाईन माहिती जिल्हा पणन कार्यालयाला पोहोचवली जाते. लवकरच धान खरेदी चे पैसे येण्याची शक्यता आहे.
बालू /प्रेमराज खंडाईत ग्रेडर पालांदूर