लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील वैनगंगा काठावर वसलेल्या पौना (खुर्द) ग्रामवासी जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत. अडीच दशकानंतरही ग्रामवासी यांची वाढीव गावठाणाची हाक प्रशासनाच्या कानी पडत नाही.आसगाव येथे सरपंचाच्या उपस्थित पत्रपरिषद घेवून ग्रामवासीयांनी गावठाणाची जागा न मिळाल्यास आंदोलनाच इशारा देॅन घेवून शासनाला निवेदन पाठविले आहे.वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वाढीव गावठाणाची मागणी शासन प्रशासनाकडे केली होती. शासनाने याची दखल घेत सन २००९ मध्ये गावाची पाहणी करून गट क्रमांक ८७, ८८, ८९ व ९९ आराजी अनुक्रमे ४.४२ हेक्टर आर जागेची मोजणी केली. मात्र त्यावर कोणताच निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नाही. फाईल बंद करून उपविभागीय कार्यालय भंडारा येथे धूळ खात पडून आहे.ग्रामवासीयांनी अधिकाºयांना अनेक वेळा विचारणा केली असता अधिकाºयांकडून उलटसुलट उत्तरे देवून गावकºयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. २५ वर्षापासून पौनाखुर्दवासीयांना शासन प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने गावकरी पुरत वैतागले आहेत. नदीला नेहमी येत असलेले पुराचे पाणी गावात शिरून गावाला बेटाचे रूप प्राप्त होत असून सरपडणाºया प्राण्यांपासून ग्रामस्थांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यातच वैनगंगेला आलेल्या पुरामुळे नदीपात्राची रूंदी दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या नदीपात्रामुळे एक दिवस संपूर्ण गावच नदीपात्रात गिळंकृत होण्याची भिती नाकारता येत नाही. वैनगंगेच्या पाण्यामुळे गाव परिसरातील भागात दलदल निर्माण झाले असून नवनिर्माण बांधकाम करणे अशक्य झाले आहे. गावकºयांपुढे एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रशासनाने अद्याप कोणताच निर्णय गावकºयांच्या बाजुने घेतला नसल्यामुळे २५ वर्षापासून वाढीव गावठाणाची जागा मिळविण्यासाठी समस्त पौनाखुर्द ग्रामवासीयांनी आसगाव ग्रामपंचायतमध्ये पत्र परिषद घेवून वाढीव गावठाणाची जागा देण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच चंद्रकला व्यंकट बावनकर, उपसरपंच शरद पडोळे, भाष्कर नंदूरकर, प्रफुल वालदेकर, दिवाकर वैद्ये, इंदूरकर, माजी उपसरपंच मोहन कुर्झेकर, नेपाल गभणे आदी ग्रामवासी उपस्थित होते.
अडीच दशकानंतरही पौना ग्रामस्थांची हाक प्रशासनापर्यंत पोहचेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM
वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वाढीव गावठाणाची मागणी शासन प्रशासनाकडे केली होती.
ठळक मुद्देसमस्यांचा अंबार : जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणार ग्रामस्थ