या राज्यामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावर असलेली धूळ उडत असल्यामुळे प्रवाशांचा थेट नाकातोंडांत जाते. यामुळे कित्येक प्रवासी आजाराने त्रस्त असल्याची माहिती आहे. रस्त्याचे काम सुरू असताना या कामावर पाणी मारायला पाहिजे जेणेकरून रस्त्यावरची धूळ उडणार नाही व आजाराची प्रवाशांना भीती राहणार नाही. या संदर्भात काही जागृत नागरिकांनी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांना कित्येकदा कळविले; पण याचा फायदा काही झाला नाही. तसेच रस्त्यावर काम सुरू असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा तुमसर -रामटेक राज्यामार्गावर असलेले जांब, कांद्री, उसर्रा या गावांत प्रवासी निवारा होते. पण, संबंधित काम करणारे कंत्राटदाराकडून प्रवासी निवारे पाडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी उन्हात उभे राहत आहे. रस्त्याचे तत्काळ बांधकाम करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दोन वर्षे लोटूनही रस्ता बांधकाम अपूर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:29 AM