शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

उन्हाच्या प्रतिकुलतेतही पोलिसांनी बजावले चोख कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 4:01 PM

Bhandara : मतमोजणी बंदोबस्तासाठी राबली खाकी

विलास खोब्रागडेलोकमत न्यूज नेटवर्कसिल्ली: भंडारा / गोंदिया लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून पलाडी येथील शासकीय इमारतीत मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता; मात्र, रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना उभे राहण्यासाठी किंवा सावलीत बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती, त्यामुळे भर उन्हात रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या पोलिसांचे हाल झाल्याचे दिसून आले. मात्र, भर उन्हातही कोणतीही कुरकुर न करता पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले.

भंडारा गोंदिया लोकसभा मतमोजणीसाठी शेकडो पोलिस तैनात केले असून, सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणीच्या आदल्या दिवसापासून पोलिस बंदोबस्त होता. यात स्थानिक पोलिसांसह बाहेरून विशेष पोलिसांची कुमक पाचरण करण्यात आली होती.

मात्र, मतमोजणी बंदोबस्तात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना दिसली नाही. त्यामुळे उन्हातान्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतल्याचे चित्र दिसले. तर काही पोलिसांना दिवसभर सावलीच मिळाली नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयाच्या गाडीजवळ बसण्याची वेळ आली. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी उकाडा मात्र कायम होता. कसलीही व्यवस्था नसताना वा झाडांची सावली नसतानाही पोलिसांनी कर्तव्य बजावले.

लहान बाळाची काळजीअनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांची मतमोजणी बंदोबस्ताकारिता ड्यूटी लावण्यात आली असून, मुक्कामी कर्तव्य बजावत असताना घरी असणाऱ्या लहान बाळाची काळजी सतावत असल्याचे जाणवले. पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांचा पहिलाच बंदोबस्त असल्याचे सांगितले. दिलेली जबाबदारी समर्थपणे पूर्ण करण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. इतर बंदोबस्तापेक्षा मतमोजणीचा बंदोबस्त वेगळा असल्याचे जाणवले. कारण दोन्ही बाजूच्या राजकीय पक्ष, उमेदवार तसेच सामान्य नागरिकांचे पोलिसांच्या कामावर लक्ष असल्याचे सांगितले.

पोलिसांकडे दुर्लक्षबंदोबस्तातील पोलिस हे दुर्लक्षित असून, बंदोबस्त स्थळी थंड पाणी, बसण्याची व्यवस्था, चहा, नास्ता किंवा वेळेवर जेवण उपलब्ध करण्यासाठी प्रशासन किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे लक्ष नसते, अशी खंतही पोलिसांच्या मनात आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४