दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे छतापर्यंतचे बांधकाम पूर्ण होऊनही निधीअभावी पुढील बांधकाम रखडले. निधीचा धनादेश द्यावा या मागणीला घेऊन चक्क एक वृद्ध दाम्पत्याने बिडीओंच्या कक्षातच बस्तान मांडले. जगातून निरोप घेण्यापूर्वी स्वत:चे घर असावे अशी काळजी करीत हे वृद्ध दाम्पत्य आयुष्याच्या संध्याकाळी जगण्यांचा संघर्ष करीत असल्याची प्रचिती यावेळी उपस्थितांना आली.विशेष म्हणजे, घरकूल बांधकामकर्ता कंत्राटदारच या वृद्ध दाम्पत्यांना येथे सोडून पळुन गेल्याची घटना गुरुवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास घडली. अनुसया रतिराम बावणे (६५) व रतिराम पैकन बावणे (७५) दोन्ही रा. नांदेड अशी लाभार्थी असलेल्या वृद्ध दाम्पत्यांची नावे आहेत. माहितीनुसार, घटनेतील वृद्ध दाम्पत्यांना सन २०१९ - २० यावर्षी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर मंजुरी अंतर्गत वृद्ध दाम्पत्यांनी एका ठेकेदाराकडून घरकुलाचे बांधकाम चालविले आहे. शरीर थकले असल्याने व राहत्या घराचे बांधकाम सुरू असल्याने संबंधित वृद्ध गावातील मंदिरातच निवासी दाखल आहेत. या लाभार्थ्यांना शासनाकडून दोन धनादेश घरकुल बांधकामासाठी देण्यात आले. त्यानुसार ठेकेदाराकरवी जवळपास घराचे छतापर्यंत घरकुलाचे बांधकाम देखील झाले आहे मात्र पुढील धनादेश अप्राप्त असल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.दरम्यान, येथील पंचायत समिती प्रशासनाकडे घरकुलाचे पुढील धनादेश मिळण्याहेतु वारंवार मागणी करुनही धनादेश प्राप्त न झाल्याने घरकुल बांधकामकर्ता कंत्राटदाराने चक्क वृद्ध लाभार्थी दाम्पत्यांना निधीसाठी लाखांदुर पंचायत समितीमधील बिडीओ च्या कक्षात सोडून तेथून निघून गेला.ऑनलाईन कामाचा फटकायासबंधाने अधिक माहिती घेतली असता घरकुल बांधकाम यंत्रणेकडुन या लाभार्थ्याची देयके तयार आहेत. मात्र संगणक संच व अन्य यंत्रणेत बिघाड आल्याने सबंधित लाभार्थ्याच्या धनादेशाची आॅनलाईन प्रक्रिया झाली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रशासनाने दखल घेऊन अशा अनेक लाभार्थ्यांची प्रकरणे तात्काळ निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.१६०० घरकूल बांधकाम अपुरेरमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गत तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी तब्बल १६०० घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. विशेष म्हणजे जवळपास ९० घरकूल लाभार्थ्यांनी आतापर्यंत करारनामे केले नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. गत पाच वर्षात आवास योजनेंतर्गत पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट पंचायत समितीला होते. मात्र २ हजार ४८९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी दाम्पत्याचा घरकुलासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM
अनुसया रतिराम बावणे (६५) व रतिराम पैकन बावणे (७५) दोन्ही रा. नांदेड अशी लाभार्थी असलेल्या वृद्ध दाम्पत्यांची नावे आहेत. माहितीनुसार, घटनेतील वृद्ध दाम्पत्यांना सन २०१९ - २० यावर्षी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर मंजुरी अंतर्गत वृद्ध दाम्पत्यांनी एका ठेकेदाराकडून घरकुलाचे बांधकाम चालविले आहे.
ठळक मुद्देधनादेशासाठी बिडीओंच्या कक्षात बस्तान : लाखांदूर पंचायत समितीतील प्रकार, अनेक लाभार्थ्यांची फरफट