शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

अखेर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:16 AM

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देमहिला रूग्णालयाचे प्रकरण : आता भूमिपूजनाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बालक दिनाच्या मुहूर्तावर प्रस्तावित जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया मंगळवारला सायंकाळी पार पडली. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होताना भंडाºयाचे तहसीलदार संजय पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रविशेखर धकाते गदगद झाले होते.भंडारा सहदुय्यम निबंधक कार्यालयात या जागेची रजिष्ट्री करण्यात आली. रजिष्ट्री झाल्यानंतर डॉ.धकाते यांनी ही माहिती आरोग्यमंत्री, जिल्हाधिकाºयांना दिली. यावेळी जमिन हस्तांतरणाच्या स्टँम्प पेपरवर शंभर खाटांच्या महिला व बाल रूग्णालय बांधकामासाठी सदर जमिन ९९ वर्षाच्या लीजवर निशुल्क देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात जमिन मालक म्हणून महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार संजय पवार आणि जमिन हस्तांतरक म्हणून रूग्णालयाच्यावतीने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रविशेखर धकाते यांच्या स्वाक्षरी आहेत.जमिनीचे मालकी हस्तांतरण आज झाले असले तरी यापूर्वीच रूग्णालय बांधकामाकरीता प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ४३.८४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पुरवणी यादीत २५ लाख रूपयांची तातडीने तरतूद करण्यात आली होती. आता रूग्णालयाच्या बांधकामासाठी भूमिपूजन लवकर होणे गरजेचे आहे.पाच एकरात होणार महिला रूग्णालयभंडारा नझुल अंतर्गत येणाºया शीट क्रमांक ५४ मध्ये भूखंड क्रमांका १६, २०/१, २०/४, शीट क्रमांक ५७ मध्ये प्लॉट क्रमांक ३/१, ३/२ असे एकूण २०,५०० चौ.मी. जागेचे मालकी हस्तांतरण करण्यात आले. यापूर्वी काही जमिन म्हाडा आणि जल शुद्धीकरण केंद्रासाठी आवंटित करण्यात आली होती. या रूग्णालयासाठी पुरेशी जमिन आवश्यक असल्यामुळे काही भाग परत मागण्यात आला. मंगळवारला रजिष्ट्री पूर्ण होताच तहसीलदार पवार यांनी संबंधित जमिनीच्या आखिव पत्रिकेमध्ये जिल्हा महिला व बाल रूग्णालय भंडारा हे नाव चढविण्यात आल्यानंतर ही सर्व कागदपत्रे डॉ.धकाते यांच्याकडे सोपविण्यात आली.