* तुमसर : १९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका २८ वर्षीय युवकाला दगळाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पवनारा चिचोली येथे घडली होती. मारहाणीत सदर युवक गंभीररित्या जखमी झाला होता. त्या प्रकरणातील आरोपीला तुमसर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गोंदिया येथून २८ डिसेंबर रोजी रात्रीला अटक केली आहे.
सचिन उर्फ चित्ता दीनदयाल धुर्वे (२५) वर्ष रा चिचोली ता तुमसर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी ही अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती आहे
तालुक्यातील पवनारा(टोली) चिचोली येथील रहिवासी पुरुषोत्तम रामसिंग पटले (२८) हा युवक हा १९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास रात्री जेवण झाल्यानंतर थंडी जास्त असल्याने बाहेर शेकोटी पेटवतो म्हणून घरून माचीस घेऊन घरापासून शंभर फूट अंतरावर असलेल्या वनविभागाच्या नाक्याजवळ गेला. तिथे चित्ता धुर्वे हा देखील हात शेकायला गेला होता. दरम्यान जखमी पुरुषत्तोमला चित्ताने खर्रा ची मागणी केली. यावरून नेहमीच तुला खर्रा कुठून देवू पैसे नाही तर कशाला शौक करतो आदी असे बोलल्याने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात चित्ता ने तिथे असलेला दगळ पुरुषत्तम च्या डोक्यात घातले व त्याला जखमी केले मात्र पुरुषत्तम हा परत उठून आपल्याला मारहाण करणार या भीतीने आणखी निर्घृणपणे दगळाने त्याचे डोके ठेचून त्याला जीवानिशी संपावणार तितक्यात पुरुषत्तम ने त्याचा तावडीतून सुटून थेट घर गाठले व घरातील कुणालाही त्याची माहिती न देता तो आपल्याला बिछान्यावर जावून झोपला परंतु वेदना असह्य झाल्याने तो बिछान्यात कन्हाळत असतांना त्याचा आई च्या लक्षात आल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील अनर्थ टळला मात्र अजून ही जखमी पुरुषत्तम हा बोलू शकत नसल्याने आरोपी चा सुगावा लावणे पोलिसांना कठीण झाले होते. दरम्यान तुमसर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरोधात भादवीचे कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक व्ही.जी. करंगामी व पोलीस हवालदार विजय शहारे यांनी तपास सुरू ठेवला होता. दरम्यान कोण-कोण त्या ठिकाणी हात शेकायला जात होते, जखमी चे कॉल रेकार्ड आदी तपासून आरोपी ची चुणूक लागताच आरोपी ने गावातून पळ काढला व मोबाईल ही बंद केला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. दरम्यान तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून मोठ्या शिताफीने आरोपीला गोंदिया येथून अटक करण्यात आली आहे.