ऑनलाईन लोकमतलाखांदूर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजेत. मात्र सरकार आता गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा विचार करीत आहे त्यामुळे गरीबांचे शिक्षण धोक्यात येत आहे. सध्याचे शिक्षण जे मिळते आहे ते दर्जेदार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणी येतात. त्यामुळे सर्वांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यमाने आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी संस्थेचे सचिव कृष्णा खोब्रागडे, बी.बी. रामटेके, स्निग्धा कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भुमेशवर महावाडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, नगरसेवक रामचंद्र राऊत, नगरसेवक देवानंद नागदेवे, रामचंद्र परशुरामकर, रमेश भैय्या, नरेश दिवटे, मुख्याध्यापक एस.के.खोब्रागडे, भाऊ रामटेके, दामोधर पारधी, दिनेश कुडेगावे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक संकटाला समोरे जावे लागत आहे. बेरोजगारी वाढली आहे अनेक शाळेतील पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शिक्षक मिळत नसल्याने शिकवताना शिक्षकांना अडचणी येत आहेत, असे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले संचालन टेंभुर्णे यांनी तर आभारप्रदर्शन लोखंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी पुरूषोत्तम दोनाडकर, बावणे, मुळे, भागडकर, नाकाडे, निमजे, संजय प्रधान, हिरालाल रहेले यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सर्वांना दर्जेदार शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:32 AM
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजेत. मात्र सरकार आता गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा विचार करीत आहे त्यामुळे गरीबांचे शिक्षण धोक्यात येत आहे.
ठळक मुद्देनाना पटोले : डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात कार्यक्रम