लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गाव विकासाचे केंद्रबिंदू करण्याकरिता गावातील सर्वांनीच सहकार्याच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करावे. सहकार्याशिवाय विकास शक्य नाही. एकमेकांना साथ देत गावाला नवे आयाम देण्याकरिता शासन तुमच्या पाठीशी आहे. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' म्हणत विकासाच्या मार्गावर चालायचे आहे. असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.मचारणा येथे केवळराम चित्रीवेकर व अन्य मान्यवरांच्या चौदावी कार्यक्रमाच्या निमित्ताने रोगनिदान शिबिर, नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर आ. परिणय फुके, माजी आ. हेमकृष्ण कापगते, नवनियुक्त सरपंच संगिता घोनमोडे, हभप चन्ने महाराज, गजानन डोंगरवार, डॉ. सुदाम शहारे, सेवानिवृत्त शिक्षक बाळकृष्ण कातोरे, भिमराव वाघदेवे, किसन कडव, माधवराव भोयर, मनोहर ठवकर, अर्जुनजी शेंडे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत लांजेवार, पराग ठवकर, युवराज दहिवले, वंदना कडव, सुरेखा झलके, इंदिरा कातोरे, मेघा सेलोकर उपस्थित होते.ना. बडोले म्हणाले, किडग्रस्त धानाला भरपाई संबंधात मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जातप्रमाणपत्राच्या अडचणी दूर करणे, दुष्काळग्रस्त परिसराला मदत मिळवून देणे, बोनस, अनुदान, कडधान्य पुरवठा करणे, स्वच्छ गाव संकल्पना, क्रिमीलिअरची मर्यादा वाढविणे, समाजात एकोपा निर्माण करणे आदी विषयावर मार्गदर्शन केले.आमदार परिणय फुके यांनी गावसेवेकरिता समर्पित भावनेने पुढे येत, हातात हात घालून ज्येष्ठांचे अनुभव पाठीशी घेऊन नव्या दिशेने गावाला उज्ज्वल बनवण्याचे आवाहन केले.नवनियुक्त सरपंच संगिता घोनमोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करीत गावविकासाकरिता कटिबध्द असून सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन केले. गावातील सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सत्कार ना. राजकुमार बडोले व हभप चन्ने महाराज यांनी केले.संचालन मिताराम शेंडे, प्रास्ताविक भाऊराव घोनमोडे तर आभार शिक्षक यादवराव घोनमोडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता भास्कर बांते, सुखदेव शेंडे, शालिकराम कातोरे, नरेंद्र मेश्राम, रविंद्र घोनमोडे, सुरेश शेंडे, दिलीप चित्रीवेकर, दशरथ कुथे, शरद मेश्राम, शामलाल किन्नाके, कुंदा ठवकर, राजश्री महादाने, गिता घोनमोडे, उर्मिला घोनमोडे, सिताराम कातोरे, चरण मेश्राम, योगीराज ढोके, संतोष कुथे, दामोधर पर्वतकार तथा मचारणावासीयांनी सहकार्य केले.
गाव विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:37 PM
गाव विकासाचे केंद्रबिंदू करण्याकरिता गावातील सर्वांनीच सहकार्याच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करावे. सहकार्याशिवाय विकास शक्य नाही.
ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्री : मचारणा येथे नवनिर्वाचित पदाधिकाºयांचा सत्कार