पवनी : पवनी पंचायत समितीचे माजी सभापती लहू खोब्रागडे यांना पवनी न्यायालयाचे न्यायाधिश एस.एस. सैय्यद यांनी सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.२३ जुलै २०१३ रोजी चिचाळ येथील शांतीवन बौध्द विहारात विहारप्रमुख जीवन मेश्राम भन्ते व इतर बौध्द मंडळी विहारात चर्चा करीत असतांना दुपारी १ वाजता पवनी माजी सभापती लहू खोब्रागडे तेथे आले व त्यांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा बौध्द विहारप्रमुख जीवन मेश्राम यांनी लहू खोब्रागडे व लिंबराजा काटेखाये यांचे विरुध्द तक्रार दाखल केली. पवनी न्यायालयाचे न्यायाधिश एस.एस. सैय्यद यांनी प्रत्यक्षदर्शी सहा साक्षदारांचे बयान नोंदविले. सहा साक्षदार लहू खोब्रगाडे यांच्या विरोधात बयान नोंदविले. त्यामुळे भादंवि ४४८, २९४, ५०६ कलमान्वये न्यायाधिशांनी खोब्रागडे यांना सहा महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा सुनावली तर लिंबराज गोपीचंद काटेखाये यांच्या विरोधात पुरावा नसल्यामुळे त्यांना निर्दोष सोडण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. एम. एम. राऊत यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)
माजी सभापतीला सहा महिन्यांची शिक्षा
By admin | Published: January 28, 2017 12:40 AM