लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मुलभूत सोयीसुविधा संबंधी रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार मधुकर कुकडे यांना रेल्वेपोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकावर घडली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले आमदार राजू कारेमोरे मदतीसाठी धावून गेले. त्यांनी रेल्वे पोलिसांवर संतप्त होत समज दिली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रेल्वेकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.तुमसर रोड रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आले होते. रेल्वे स्थानकावर मुलभूत सोयी सुविधा फुटवे ब्रिज दुसऱ्याबाजेने बांधकाम करावे, आदी मागण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी खासदार मधूकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे आपल्या कार्यकर्त्यांसह तुमसर रोड रेल्वेस्थानकावर सकाळी गेले. मात्र रेल्वे पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. धक्काबुक्की करत मागे सारले. यात माजी खासदारांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. यावेळी उपस्थित आमदार कारेमोरे यांनी रेल्वे पोलिसांना असे करण्यास मज्जाव केला. त्यावेळी शाब्दिक खडाजंगी उडाली. पोलीस व कार्यकर्त्यात तणाव निर्माण झाला.यावेळी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सीमा भुरे यांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना मधूकर कुकडे आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या भेटीची माहिती दिली होती. मात्र बॅनर्जी यांचा दौरा कार्यालयीन असून त्यात राजकारणांचा संबंध नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे भुरे यांनी नाराजी व्यक्त करून वरिष्ठ नेत्यांना याची तक्रार करणार असल्याचे सांगितले.अखेर माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे, सीमा भुरे, प्रमोद तितीरमारे यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेवून याप्रकरणावर पडदा पाडला. या शिष्टमंळात सरपंच रिता मरस्के, रमेश धोटे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, अशोक बन्सोड, देवसिंग सव्वालाखे, लव बशिने, चैनलाल मरस्के, मोरेश्वर ठवकर, देवेंद्र शहारे, प्रदीप बोंद्रे, सुशील बन्सोड, श्याम नागपुरे, आलम खान आदींचा समावेश होता.राजू कारेमोरे रेल्वे पोलिसांवर संतापलेमाजी खासदार मधुकर कुकडे यांना धक्काबुक्की होत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेले आमदार राजू कारेमोरे रेल्वे पोलिसांवर चांगलेच संतापले. त्यावेळी शाब्दिक चकमकही उडाली. आता याप्रकरणी गैरवर्तणूक करणाºया आणि असभ्य वागणूक देणाºया रेल्वे पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. माजी खासदार मधुकर कुकडे म्हणाले, लोकशाही मार्गाने भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्याशी गैरवर्तन करून धक्काबुक्की केली. या पोलिसांची आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार असून हा प्रकार योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदारांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:00 AM
तुमसर रोड रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आले होते. रेल्वे स्थानकावर मुलभूत सोयी सुविधा फुटवे ब्रिज दुसऱ्याबाजेने बांधकाम करावे, आदी मागण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी खासदार मधूकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे आपल्या कार्यकर्त्यांसह तुमसर रोड रेल्वेस्थानकावर सकाळी गेले.
ठळक मुद्देतुमसरची घटना : रेल्वे महाव्यवस्थापकांच्या भेटीदरम्यानचा प्रकार