शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी

By admin | Published: November 11, 2016 12:41 AM

जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन निवडणुका होत असले तरी १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

नगर परिषद निवडणूक : सामाजिक समिकरणावर भरभंडारा : जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन निवडणुका होत असले तरी १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यावयाचा असल्यामुळे या निवडणुतील लढती रंगतदार ठरणार आहेत. अशातच भंडारा व तुमसरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे याठिकाणच्या लढती चुरशीची होणार असून त्यापूर्वी उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. दरम्यान, विद्यमान नगरसेवक विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असले तरी पालिका निवडणुकीसाठी ईच्छुकांची पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी सुरू असून शहरात भेटीगाठींचा वेग वाढला आहे. भंडारा शहरात राजकीय पक्षांकडून मतांसाठी सामाजिक समिकरण साधण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या समाजातील मतदारसंख्या अधिक त्याच समाजातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्यावर भर आहे.भंडारा शहरात भाजपाकडून प्रबळ दावेदार संजय कुंभलकर हे असून सुर्यकांत ईलमे, सुनील मेंढे, चंद्रशेखर रोकडे, मंगेश वंजारी, राष्ट्रवादीकडून विद्यमान नगराध्यक्ष बाबूराव बागडे, भगवान बावनकर, धनराज साठवणे, काँग्रेसकडून सचिन घनमारे, शिवसेनेतून संजय रेहपाडे, अनिल गायधने, अ‍ॅड.रवी वाढई, भाकपकडून सदानंद ईलमे, ओबीसी एनटी पार्टीकडून शालीकराम झंझाळ यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक लढण्यादृष्टिने त्यांनी तयारी केली आहे. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माधव फसाटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक आहेत. याशिवाय बसपा, बीआरएसपी, एमआयएम या पक्षांकडून उमेदवार रिंगणात उभे केले जाणार आहे.भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी ७८,८११ मतदार असुन ३५ टक्के मते एकट्या तेली समाजातील आहेत. भंडारा शहरातील प्रत्येक प्रभागात तेली समाजाची मते अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील २३ ते २४ हजार ही मते निर्णायक ठरणारी आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाची बहुतांश मते भाजपाला मिळाली होती. त्यामुळे प्रत्येकच राजकीय पक्षांकडून या समाजातील उमेदवारांचा शोध सुरू आहे. भंडारा अर्बन बँकेच्या निवडणुकीत तेली समाजाला डावलण्यात आल्यामुळे भाजपा आणि शिवसेना हे पक्ष नगरपालिका निवडणुकीत कोणत्या समाजाला जवळ करतात आणि कुणाला उमेदवारी देतात, यावर विजयाचे समिकरण अवलंबून राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)