शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

शिक्षण विभागाने ठेवल्या उत्सव काळात चाचण्या

By admin | Published: September 13, 2015 12:37 AM

उत्सव काळात चाचणी परीक्षा घेवू नयेत असा महाराष्ट्र शासनाने जीआर काढला. त्याच दिवशी आयुक्त शिक्षण कार्यालयाने एक परिपत्रक काढत पायाभूत चाचणी परीक्षा ...

मोहाडी : उत्सव काळात चाचणी परीक्षा घेवू नयेत असा महाराष्ट्र शासनाने जीआर काढला. त्याच दिवशी आयुक्त शिक्षण कार्यालयाने एक परिपत्रक काढत पायाभूत चाचणी परीक्षा १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत घेण्याची घोषणा केली. जीआर मंत्रालयातून निघाला अन् परिपत्रक पुणे येथून शिक्षण आयुक्तांनी जारी केला. यामुळे शिक्षण विभागातील गोंधळ व समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर समजून घेवून त्यानुसार विद्यार्थी निहा, क्षमता निहाय कृतिकार्यालय तयार करणे हा पायाभूत चाचणीचा हेतू आहे. राज्यात गुणवत्ता विकासासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरी ते आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या दोन विषयाच्या पायाभूत चाचण्या घेतल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी ८ सप्टेंबर रोजी पायाभूत चाचणी घेण्याचा वेळापत्रक जारी केला आहे. या पायाभूत चाचण्या १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत घेण्यात याव्या अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तर त्याच दिवशी ८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रक काढला. राज्यातील धार्मिक सण व उत्सव इत्यादीच्या कालावधीत परीक्षा व चाचण्यांचे आयोजन करण्यात येवू नये अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. यात गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण, नाताळ, ईद व अन्य धार्मिक सण, उत्सवाचा समावेश आहे. राज्यात गणेश उत्सव १७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. १६ सप्टेंबर रोजी हरितालीका आहे. त्या दिवशी शाळांना सुटी ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सव दहा दिवस चालतो. म्हणजे पायाभूत चाचणी घेण्याचा कालावधी गणेश उत्सवात येतो. शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पायाभूत चाचणीचा वेळापत्रक दिला गेला आहे. या पायाभूत चाचण्या जुलै अखेर अपेक्षित होत्या. ‘ई-टेंडरिंग’ प्रक्रियेत अडकून अखेर पायाभूत चाचणीला गणेशोत्सवाला मुहूर्त मिळाला. दोन परिपत्रकामुळे शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ निर्माण झालेला आहे. आता दोन दिवसानंतरच पायाभूत चाचण्या होतात की, पुढे ढकलल्या जातात. याविषयी शिक्षकांना उत्सूकता लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)