इंद्रपाल कटकवार
भंडारा : मर्यादेपेक्षा कुठलीही वस्तू अधिक झाली तर ती हानिकारक होते. असेच मानवी आरोग्याबाबतही आहे. अधिक आहार घेतल्याने ‘बुलीमिया’ हा आजार होतो. तसेच शरीरात वाजवीपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास आरोग्याला अपायकारक होऊ शकते. एखादवेळी किंवा दिवसाकाठी अधिक पाणी प्यायल्यास अडचण नाही मात्र ती सवय झाली तर शरीरावर परिणाम जाणवू लागताे. यात व्यक्ती प्राथमिक स्वरूपात चिडचिड करणे, अंधुक दिसणे किंवा वेळ प्रसंगी पक्षाघाताची शक्यता असते. त्यामुळे दिवसाकाठी प्रत्येक व्यक्तीने चार ते पाच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र त्यापेक्षा अधिक पाणी पिणे योग्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
बॉक्स
शरीरात पाणी कमी पडले तर...
शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ देऊ नये. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेला पाण्याची फार आवश्यकता असते. याशिवाय पाचनशक्तीसाठी पाणी आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे ही अत्यंत गरजेचे आहे.
बॉक्स
शरीरात पाणी जास्त झाले तर...
मानवी शरीरात वाजवीपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास त्याचा फटका ब्रेनला होऊ शकतो. याशिवाय मसलमध्ये क्रॅम्प येणे, अंधूक दिसणे आदी प्रकार किंवा लक्षणे दिसू लागतात.
बॉक्स
तज्ज्ञ काय म्हणतात...
मानवी आरोग्य सुदृढ राहणे हे कुणालाही अपेक्षित बाब वाटते. त्यासाठी शरीरातील कुठलीही मात्रा संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची ही तेवढेच महत्त्व आहे. पाणी हे जीवन असून प्रत्येकाने दिवसाकाठी चार ते पाच लिटर पाणी पिणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा जास्त पाणी पीत असल्यास सावधान होण्याची गरज आहे. एखादवेळी जास्तीचे पाणी प्यायल्यास हरकत नाही मात्र ती सवय होऊ नये. अधिकचे पाणी पिण्याची सवय पडल्यास याचा परिणाम ब्रेनवर होऊ शकतो. व्यक्तीत चिडचिडेपणा, ओरडणे, अंधूक दिसणे, मसलमध्ये क्रॅम्प येणे आदी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे संतुलित आहार व पाण्याची मात्रा शरीरात योग्य राहावी याची काळजी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अमित कावळे, भंडारा.