यावेळी कार्यक्रमासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार पांडे, गडेगावचे पोलीस कर्मचारी जगताप, कारधा टोलनाक्याचे पदाधिकारी कुमार जास्वाल तसेच भंडारा चालक संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, सचिव प्रमोद बालपांडे, तालुकाध्यक्ष सुनील बांगडे, सदस्य अरुण साठवणे, अनिल हटवार, किशोर माने, सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा येथील अंमलदार तसेच अन्य वाहनचालकांची उपस्थिती होती. यावेळी भंडारा बसस्थानकात आयोजित चालक दिनानिमित्त चालक, मालक तसेच चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चालक-मालकांना वाहतुकीसंदर्भात नियमांचे तंतोतंत पालन करून अपघात रोखण्यासाठी, तसेच कोरोनाची दक्षता घेण्यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी साधारण १३० वाहनचालकांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी, चालक संघटनेचे पदाधिकारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.