शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

ग्रामस्तरावरील उघड्या हागणदारीला हद्दपार करा

By admin | Published: August 24, 2016 12:15 AM

वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात.

कविता बनकर यांचे प्रतिपादन : बोरी येथून कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ, गृहभेटीतून दिला शौचालय बांधण्याचा संदेशतुमसर : वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही बाब कुटुंबासाठी सन्मानपूर्वक नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावरील हागणदारीला हद्दपार करावे, असे प्रतिपादन तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर यांनी केले. पंचायत समिती तुमसर, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) यांचे वतीने २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या राज्यव्यापी कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ सोमवार २२ आॅगस्टला ग्रामपंचायत बोरी येथे करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर, सरपंच भाऊराव उपरीकर, उपसरपंच शांताबाई कांबळे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, ग्राम पंचायत सदस्य राधेश्याम कांबळे, मायाबाई डोंगरवार, सचिव सेलोकर, समूह समन्वयक अनिता कुकडे, शशीकांत घोडीचोर, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. सभापती बनकर म्हणाल्या, प्रत्येक गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याची सुरुवात विकास प्रक्रियेतून होत आहे. प्रत्येक गावातील कुटुंबांनी शौचालय बांधकाम व वापर केल्याशिवाय गावांचा विकास अशक्य आहे. प्रत्येक गाव हा हागणदारीमुक्त झाला पाहिजे. याकरिता कुटुंबांनी शौचालय बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कुटुंबांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर केल्यास घर, गाव सुंदर व स्वच्छ करता येईल. याकरिता सामूहिकरित्या उघड्या हागणदारीला हद्दपार करण्याची योग्य वेळ आलेली आहे, असे सांगितले.गट विकास अधिकारी हिरुडकर म्हणाले, शौचालयाअभावी नागरिक हातात बिसलेरीची बॉटल, टमरेल धरून उघड्यावर हागणदारीला जातात. ही प्रत्येक कुटुंबासाठी सन्मानाची बाब नाही. यामुळे कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. मान सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील आईवडील, पत्नी, मुली, सुन, बालके यांचेसाठी शौचालय बांधकाम करणे आवश्यक आहे. घरी शौचालय नसल्यामुळे गावातील, घरातील वातावरण आल्हाददायक राहत नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून मोठ्या प्रमाणात मिळकत खर्ची होते. पिण्याचे पाणी सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे कुटुंब तेथे शौचालय हे सूत्र लक्षात घेता बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले व बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहनपर राशी त्वरीत देण्याची ग्वाही यावेळी दिली.माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे यांनी कुटुंब संवाद अभियान राबविण्यामागचा उद्देश सांगून नागरिकांना प्रत्येक घर हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी संवाद गटाची निर्मिती करून त्या गटांना गृहभेटीतून स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. गावात सर्वप्रथम शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या सुपचंद कांबळे यांचा सभापती व गट विकास अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावात सभापती कविता बनकर, गटविकास अधिकारी हिरुडकर, सरपंच उपरीकर व पदाधिकारी, कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीत शौचालय नसणाऱ्या कुटुंबाकडे गृहभेटीतून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)