जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यांतील शेतकरी कर्ज काढून शेती करतात; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत आहे. अशीच भयाण परिस्थिती या वर्षात धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. ते शिक्षण व परीक्षा शुल्काचा भरणा करू शकत नाहीत. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या पाल्यांचे शिक्षण व परीक्षा शुल्क माफ करणारा निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्ष वर्धन, हुमणे, कोमल कांबळे, धनराज तिरपुडे, नरेन्द्र कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गून वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर ऊके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, यशवंत घरडे, अविनाश खोब्रागडे, सुरेश गेडाम, रतन मेश्राम, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, शांताराम खोब्रागडे, नीतीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, मोरेश्वर लेंडारे, जितेंद्र खोब्रागडे यांनी एका निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:32 AM