शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का? शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले
2
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ८०० फूट उंच कड्यावरुन झळकावला बॅनर!
3
मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे...! शिंदेंनी अचानक पुन्हा सर्व बैठका रद्द केल्या, अजित पवार दिल्लीला जाणार
4
"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप
5
INDU19 vs JPNU19 : सेंच्युरीसह भारतीय कॅप्टनची तिलक वर्मा-संजू सॅमसनच्या क्लबमध्ये एन्ट्री
6
Avadh Ojha: कोचिंग शिक्षक ते आप नेता; अवध ओझांची नेटवर्थ किती?
7
Postal to EVM मतांमध्ये इतका ट्रेंड बदलला कसा?; वरूण सरदेसाईंनी आकडेवारीच मांडली
8
नगरसेवकाला कॉल केला आणि...; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या आत्महत्येनं खळबळ
9
तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला
10
नववर्षापूर्वी देशातील सर्व बँक खातेदारांना मोठं गिफ्ट! अर्थमंत्री संसदेत मांडणार महत्त्वाचं विधेयक
11
करीना कपूर- अभिषेक बच्चन एकाच स्टेजवर, बरेच वर्षांनी आले एकत्र; करिष्मामुळे आला होता दुरावा?
12
दत्त जयंती: गुरुचरित्र पारायण करणार आहात? २० नियम पाहा, आचरणात आणा; दत्तकृपेस पात्र व्हा!
13
हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना; संसदेला घेराव घालण्याची तयारी, काय आहेत मागण्या..?
14
जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स 
15
पाकिस्तानातील सर्वात महागडा पॅलेस, किंमत ऐकून तुम्ही म्हणाल...
16
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, लग्नसराईच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
17
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
18
बाप रे बाप! हुंड्यात अडीच कोटी, तर शूज पळवण्याच्या बदल्यात ११ लाख, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाची एकच चर्चा
19
Vaibhav Suryavanshi नं छोटेखानी खेळीत पेश केला फटकेबाजीचा क्लास नजराणा (VIDEO)
20
विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट

अनुपस्थितांनाही देता येणार परीक्षा

By admin | Published: September 10, 2015 12:27 AM

अपवादात्मक परिस्थितीत काही मुले शाळेत अनुपस्थित राहतात. अशावेळी दीर्घकालीन अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्याची व अभ्यास भरून काढण्यासाठी..

दिलासा : उत्सवांत चाचणी परीक्षेची मनाईमोहाडी : अपवादात्मक परिस्थितीत काही मुले शाळेत अनुपस्थित राहतात. अशावेळी दीर्घकालीन अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्याची व अभ्यास भरून काढण्यासाठी सवलत देण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत १ ली पाणी वर्गासाठी २०० कार्यदिन तसेच प्रत्यक्ष अध्यापनाचे ८०० घड्याळी तास तसेच सहावी व आठवीसाठी २२० कार्यदिन व प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाने १००० घड्याळी तास निश्चित केले आहेत. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त देता येत नाही. यासोबतच कामाचे दिवस २३० होणे आवश्यक आहे. शाळांचे भौतिक, शैक्षणिक विद्यार्थी विकास, समस्या सोडविण्यासाठी तसेच शालेय कामकाजात पालकांचा सक्रीय सहभाग व सहयोग वाढविण्यासाठी पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली आहे.अधिनियम, नियम, मार्गदर्शक सुचना आदीच्या अनुषंगाने आर्थिक सण, उत्सव कालावधीत शाळांना अल्पमुदतीच्या सुटी देण्याविषयी शासनाचा विचार होता. त्याप्रमाणे गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, ईद आदी धार्मिक सण, उत्सव कालावधीत शाळांना अल्पमुदतीच्या सुट्या देणे, या कालावधीत परीक्षा घेणे याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. शासनाचे आदेश, नियम मार्गदर्शक सुचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधीन राहून शाळांच्या सुटींचे नियोजन व त्यात बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीत मान्य केला जावा. स्थानिक गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघांची सहमती व शिफारशीनुसार गणेशोत्सव दिवाळी पर्युषण पर्व, नाताळ, ईद या धार्मिक सण, उत्सवात चाचणी परीक्षाचे आयोजन करण्यात येवू नये. शिक्षणाधिकाऱ्यांनी या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे अन्यवेळी परीक्षा घेण्याबाबत व अभ्यास भरून काढण्याबाबत नियोजन करुन नियोजनाची सुचना सर्व शाळांना देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या आशयाचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)