विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वत्र रस्ता बांधकामाचे कार्य जोमात सुरु आहे. त्यात भंडारा- पवनी राज्यमार्गाचा समावेश आहे. या रस्त्याच्या समावेश महामार्गात झाल्यानंतर रस्ता विस्तारीकरणाचा कामालाही प्रारंभ करण्यात आला. जवळपास नऊ महिन्यांपासून रस्ता विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. भंडारा तालुक्यातील आंबाडी ते पवनी तालुक्यातील निलजफाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. हा रस्ता सिमेंटचा तयार करण्यात येत आहे. बांधकाम संथगतीने सुरु असल्याने रहदारीला फटका बसत आहे.शेकडो वृक्षांची कत्तलमहामार्गाच्या विस्तारीकरणात रस्ताच दुतर्फा असलेले शेकडो वृक्ष तोडण्यात आली आहेत. यात काही भाग अपवाद आहे. मात्र वृक्षाची कत्तल केल्यानंतर त्यापर्यंतचा भाग मुरुम व बोल्डर टाकून समांतर करण्यात आला आहे. काही भागात हा रस्ता समतल नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हाच मार्ग उमरेड कºहांडला अभयारण्यालाही जोडतो.केवळ दहा टक्के बांधकामआंबाडी ते निलज फाट्यापर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आले. जवळपास ४० किमीचा या रस्ता बांधकामापैकी केवळ १० ते १२ टक्के बांधकाम पुर्ण झाले आहे. कार्य सुरु करण्याचा कार्यकाळ हा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम एवढेच कसे झाले, बांधकाम संथगतीने का होत आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे.धुळीमुळे आरोग्यावर परिणामबांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने खोदकाम केलेले जागेत बोल्डर व मुरुम घालण्यात आला आहे. परिणामी वाहनाचे आवागमन सुरु होताच धुरीचे लोट उडत असतात. ही धुर थेट नाकातोंडाद्वारे शरीरात जात आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वेळीच मातीच्या जागेवर पाणी घालणे गरजेचे असताना बांधकाम करणारी एजन्सी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:42 AM
भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देभंडारा - पवनी राज्यमार्ग : आरोग्यावर परिणाम, बांधकामही कासवगतीने