शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हिवाळी अधिवेशनात पर्यटन विकासाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM

भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी यांचे उदासिन धोरणाचा फटका पर्यटन स्थळाला बसला आहे.

ठळक मुद्देग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ : दुसऱ्या टप्प्यातील कामे अडली, विकास कार्याची गरज

रंजीत चिंंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील ग्रीनव्हेली चांदपूर पर्यटन स्थळाचा रखडलेला विकास मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. यामुळे विकास कार्यांना मंजुरी देण्याची गरज आहे. गत पाच वर्षापासून विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे.भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी यांचे उदासिन धोरणाचा फटका पर्यटन स्थळाला बसला आहे. नवीन निविदा निघाल्या नाहीत, तर इको टुरिझम व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गोंधळात पर्यटन स्थळाचा विकास लांबणीवर गेला आहे.राज्य शासनाच्या हिरव्या झेंडीची प्रतीक्षा करीत असणाऱ्या पर्यटन स्थळाला उपेक्षित ठेवण्यात आले आहे. सन २०१४ पर्यंत पर्यटन विकास कार्यावर निश्चित यंत्रणेची घोषणा करण्यात आली नाही. यामुळे विकासाला गती मिळाली नाही. १०० पेक्षा अधिक तरूणांना रोजगार आणि परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत करण्याची क्षमता या पर्यटन स्थळात असताना विकास कार्य डोक्यावर घेण्यात आले नाही.माजी आमदार चरण वाघमारे यांनी पर्यटन स्थळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत १ कोटी ८५ लाख रूपयाचा निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटन स्थळात केवळ विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे. यानंतर जलाशय परिसरात कामे सुरू करण्यात आली नाही. विदर्भातील समस्या आणि प्रश्न सोडविण्याकरिता नागपुरात हिवाळी अधिवेशनात पर्यटन स्थळाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. जलाशयात बोटींग व्यवसाय, जलतरण प्रशिक्षण तथा जंगल सफारीसाठी चांदपुरात सकारात्मक वातावरण आहे. याशिवाय गावात विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या जागृत हनुमान देवस्थान तिर्थस्थळ, चांद शा वली दरगाह, ऋषी मुनी आश्रम व चांदपूर गावाची संस्कृती आहे. राज्य शासनाने या गावाचे विकास कार्यात मदत करण्याची गरज आहे.नद्यांचे काठ विकसित करावैनगंगा, बावनथडी नद्यांचे काठ विकसित करण्याची गरज असून पर्यटन स्थळाला मोठी चालना मिळणार आहे. गावांचे विकास कार्य भरभराटीला येणार असून पर्यटन स्थळाच्या विकास कार्यासाठी आमदार राजू कारेमोरे सकारात्मक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.चांदपूर पर्यटन स्थळाच्या विकासाने परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत होणार असून रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता प्रत्यक्षपणे विकास झाले पाहिजे.-किशोर रहांगडाले, बिनाखी.पर्यटन आणि तिर्थस्थळाच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. हिवाळी अधिवेशनात विकास कार्य मार्गी लावण्याची गरज आहे.-उर्मिला लांजे, सरपंच, चांदपूर.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशयtourismपर्यटन