किराणा वस्तूंच्या किमतीतही भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तरी शासनाने नियंत्रणात ठेवल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकेल. ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. तर पाच किलो ग्रॅम छोट्या सिलेंडरच्या किंमतीत १८ रुपयांची दरवाढ झाली आहे. अचानकच झालेल्या या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. लॉकडॉऊन कालखंडापासून विविध किमतीमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे. आता सर्व जनजीवन सुरळीत झाले असतानाही अनेक वस्तूंचे दर कमी झालेले नाहीत तर काही व्यापारी मालाचा पुरवठा होत नसल्याचे कारण करीत काही वस्तू ज्यादा दराने विक्री करीत आहेत. नागरिकांनी आपल्या गरजांना आवर घातली आहे. मात्र गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याची प्रतिक्रिया भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथील संगीता गिरीपुंजे यांनी दिली. त्यातच गॅस एजन्सीचे वितरक हे घरपोच डिलिव्हरीसाठी अतिरिक्त ४० ते ५० रुपये घेत असल्याने नागरिकांना त्याचाही अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडर सहाशे ९३ वरून थेट सातशे पाच रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे अनेकांची कसरत सुरू आहे. अशीच कसरत व्यवसायिकांची ही सुरु आहे. व्यावसायिक सिलेंडर १३२३ करून चक्क १३५९ रुपयांवर रुपयांना मिळत आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या किमतीही तब्बल भरघोस वाढ झाली आहे. शासनाकडून सर्वसामान्यांना होणारा केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अन्य इंधन उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा घरोघरी चुली पेटल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे वृक्ष तोड वाढू शकत असल्याचा अंदाज आहे.
घरगुती गॅस सिलेंडरही स्वयंपाक घरातील अत्यंत गरजेची वस्तू आहे. त्यामुळे शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने वाढत्या वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
दिपाली आकरे,खरबी
सामाजिक कार्यकर्त्या, खरबी (नाका)
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे. आधीच ५० रुपयांची दरवाढ आणि घरपोच डिलिव्हरीसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याने संसार करताना तारेवरची कसरत होत आहे.
संगीता गिरीपुंजे गृहिणी, खरबी (नाका)