शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीची तज्ज्ञांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 5:00 AM

भंडारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पाईप व प्रणालीची तपासणी करणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही जिल्हास्तरीय समिती काम करणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांचे प्राचार्य या समितीचे सदस्य असतील. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेचे यू. आर. खाटोडे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय समिती गठित : नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नाशिक येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन प्रणालीची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी साकोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत.भंडारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पाईप व प्रणालीची तपासणी करणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही जिल्हास्तरीय समिती काम करणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांचे प्राचार्य या समितीचे सदस्य असतील. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेचे यू. आर. खाटोडे या समितीचे सदस्य सचिव आहेत. ऑक्सिजन पाईपची तपासणी करण्यासाठी औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक मनुष्यबळाचे पॅनल तयार करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. या पॅनलला तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.तांत्रिक मनुष्यबळाच्या सहाय्याने जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतील संपूर्ण ऑक्सिजन प्रणालीचा कालबध्द कार्यक्रम आखून तपासणी होणार आहे. या तपासणीवेळी गळती असल्यास अथवा पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्यास त्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल विचारात घेऊन जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाल्याने पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. परंतु कोणताही तांत्रिक बिघाड होऊ नये. नाशिक सारखी घटना भविष्यात घडू नये यासाठी ही समिती सर्व रुग्णालयांची पाहणी करणार आहे. 

तीन शासकीय व १८ खासगी रुग्णालयांत प्रणाली जिल्ह्यात तीन शासकीय व १९ खासगी रुग्णालयांत प्राणवायू प्रणाली कार्यरत आहे. या सर्व रुग्णालयांची तपासणी समिती करणार आहे. यात सर्वाधिक ऑक्सिजन पॉईंट भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात  आहेत. आयसोलेशन बिल्डींग, मुख्य इमारत तिसरा मजला, पेईंग वार्ड, नेत्रचिकित्सा वार्ड असे मिळून ऑक्सिजनचे १४२ पॉईंट आहेत. यासोबतच साकोली रुग्णालय २० व तुमसर रुग्णालयात ५० पॉईंट आहेत. या सर्व ठिकाणची तपासणी समिती करणार आहे. जिल्ह्यात असलेल्या खासगी रुग्णालयांतील प्राणवायू प्रणालीची तपासणीही ही समिती तांत्रिक मनुष्यबळामार्फत करुन घेणार आहे. 

ऑक्सिजन गळती व प्रणालीची तपासणी करण्यासाठी समिती अध्यक्षांनी कालबध्द कार्यक्रम तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांना पूर्वसूचना देण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या तपासणीसाठी  तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त होताच त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. -संदीप कदम, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलOxygen Cylinderऑक्सिजन