शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:40 AM

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी आजवर केंद्र किंवा राज्य सरकारने एकही योजना राबविली नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मोहाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतमोहाडी : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी आजवर केंद्र किंवा राज्य सरकारने एकही योजना राबविली नाही. सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही. पोकळ आश्वासने आणि दिशाभूल करणाऱ्या शासनाला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढवून राष्ट्रवादी पक्ष घराघरापर्यंत पोहोचविला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार अनिल बावनकर, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, सभापती शुभांगी राहांगडाले, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.यावेळी नाना पंचबुद्धे, रामलाल चौधरी, किरण अतकरी, संगीता सुखानी यांनी पक्ष संघटन वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले. संचालन महासचिव विजय पारधी यांनी तर आभारप्रदर्शन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नितेश फुलेकर यांनी केले.या कार्यक्रमाला श्रीकृष्ण पडोळे, बाबूराव मते, विठ्ठलराव कहालकर, श्रीधर हटवार, प्रमिला साकुरे, यशवंत ढबाले, केशवराव बांते, प्रदीप बुराडे, शामराव गजभिये, कार्तिक ईश्वरकर, विजय डेकाटे, राजू कारेमोरे, कल्याणी भुरे, किरण अतकरी, हरिभाऊ डोये, राजकुमार माटे, महादेव पचघरे, अश्वनिता लेंडे, रिता हलमारे, अरुण तितीरमारे, संजय मिरासे, लोमेश वैद्य उपस्थित होते.कार्यक्रमासाठी शहर अध्यक्ष किशोर पातरे, नगरसेविका मनिषा गायधने, ज्ञानेंद्र आगाशे, सुरेंद्र वंजारी, फिरोज शेख, धीर पाटील, नवीन भैसारे, हितेश साठवणे, क्रिष्णा पराते, विनोद नंदनवार, मुरलीधर गायधने, कशील आंबागडे, राहुल मेहर, कदीर शेख, संजय मिरासे, दिलीप गजभिये, कैलाश तितीरमारे, राजेश लेंडे, मदन गडरिये, नरेश ईश्वरकर, रमेश चाचीरे, प्रदीप बुराडे, रामरतन खोकले, श्याम कांबळे, अरुण तितीरमारे, सदाशिव ढेंगे, नरेंद्र पिकलमुंडे, संजय टिकापाचे, अरविंद येळणे, मंगेश साऊसाखरे, निर्मला पाटील, अनिल सोनवाने, घनश्याम कुंभरे, महादेव फुसे, संजय शेंडे, विनोद बाभरे, राहुल वानखेडे, सोनू रामटेके, गणेश बांडेबुचे यांनी सहकार्य केले.