शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

माडगी घाटातून रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 5:00 AM

तुमसर गोंदिया  राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील रेती गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून रेतीचा साठा करण्यात येतो. येथे मोठा रेती साठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची मूक संमती : खनिकर्म विभाग कारवाई करणार काय?

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील पांजरा येथील घाटावर भंडारा येथील खनिकर्म विभागाच्या पथकाने धडक दिली. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माडगी येथे घाटातून दररोज राजरोसपणे रेतीची चोरी सुरू असताना महसूल व खनिकर्म विभाग कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. दोन्ही विभागाने येथे मूक संमती दिली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माडगी गावाच्या प्रवेशद्वारावरच रेती तस्करांनी प्रचंड मोठा रेती साठा केला आहे. तेथून जेसीबीद्वारे टिप्परमध्ये रेती भरण्यात येते. नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे ही रेती रेतीसाठ्यात जमा केली जाते.तुमसर गोंदिया  राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील रेती गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून रेतीचा साठा करण्यात येतो. येथे मोठा रेती साठा उपलब्ध आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत नदीपात्रातून रेतीचा उपसा केला जातो. महसूल प्रशासनाने हा रेती घाट लिलाव केला नाही. माडगी गाव व नदीपात्राचे अंतर अतिशय कमी आहे. गावाच्या सुरक्षेकरिता व घाटाचे क्षेत्रफळ कमी असल्याने महसूल प्रशासनाने येथे रेती घाटाचा लिलाव केला नाही; परंतु दुसरीकडे येथे तस्करांनी प्रभावशील लोकांना हाताशी धरून रेती चोरी सर्रास सुरू केली आहे. रेती चोरी करणारे तालुका बाहेरचे आहेत. महसूल मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर हा रेती घाट आहे. या गावात  महसूल प्रशासनाचा कर्मचारी कर्तव्यावर राहतो; परंतु अजूनपर्यंत या रेती तस्करावर कोणतीच कारवाई झाली नाही. रेती चोरीची  मुभा कोणी दिली हा संशोधनाचा विषय आहे.नियमांना तिलांजली- गावाच्या प्रवेशद्वारावर रेती साठ्यातून जेसीबीने ट्रक व टिप्पर भरून त्याची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे; परंतु अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही. तीन दिवसांपूर्वी रेतीच्या  एका ट्रकने गावाचे प्रवेशद्वार भुईसपाट केले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे पाणी कुठेतरी मुरत आहे असे दिसून येते. नियमावर बोट ठेवणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची रेती या रेती घाटातून चोरी करण्यात आली. रेती चोरी करणे व तिची वाहतूक करणे हा मोठा गुन्हा आहे असे सांगण्यात येते; परंतु माडगी घाटात नियमांना तिलांजली देण्यात येत आहे.

 

टॅग्स :sandवाळू