मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये किलोग्रॅम आहे. दर नाही म्हणून साखर कारखान्याने विक्री केली नाही असे सांगण्यात येत आहे. कारखान्यात सध्या सुमारे ८ कोटीपेक्षा जास्त रूपयांची साखर पडून आहे.भंडारा जिल्ह्यात एकमेव मानस साखर कारखाना देव्हाडा येथे आहे. जिल्ह्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. संपूर्ण ऊस मानस कारखान्याला शेतकऱ्यांनी विक्री केला. कारखान्याने शेतकऱ्यांना केवळ अर्धे पैसे दिले. ऊर्वरित पैसे अद्याप दिलेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून ऊसाची लागवड केली होती. त्यामुळे व्याजाचे पैसे वाढत आहे. पावसाळा सुरू झाला असून धानाची पेरणी व इतर कामे करावयाची आहेत.शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांकडून २८ कोटींचा उस खरेदी केला आहे. त्यापैकी २० कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून ऊर्वरित ८ कोटी रूपये काही दिवसात देण्यात येणार असल्याचे समजते. कारखान्यातील गोदामात सुमारे १ लाख २७ हजार मेट्रीक टन साखर पडून आहे. या साखर कारखान्यात सुमारे २५० कामगार आहेत.या कारखान्याची ऊस गाळप करण्याची क्षमता २ लाख मेट्रिक टन आहे, पंरतु यावर्षी केवळ १ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले. पुढीलवर्षी दोन ते अडीच लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यास भंडारा जिल्ह्यात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. नियमित व वेळेवर ऊसाचे पैसे मिळत नसल्यामुळे ऊस पीक घेणे बंद करावे? या विवंचनेत येथील ऊस उत्पादक शेतकरी साबडला आहे.यावर्षी २८ कोटींचा ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला. ८ कोटी रुपये लवकरच देण्यात येतील. दरवर्षी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येतो. सध्या साखरेचे दर कमी झाल्याने कारखान्याने साखर विक्री केली नाही. साखर विक्री करुन शेतकऱ्यांचे सर्व पैसे देण्यात येतील.- विनोद राऊत, व्यवस्थापक मानस कारखाना देव्हाडा.साखरेचे दर कमी आहे म्हणून साखर विक्री केली नाही. शेतकऱ्यांनी वाढ होण्याची वाट पाहावी का? धानाचा हंगाम सुरु झाला आहे. भाव कमी जास्त होणे ही प्रक्रिया आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये. अन्यथा आंदोलन करावे लागेल.- डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर.८ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ८ कोटी रुपये थकीत आहे. कारखान्यात साखर पडून आहे. धानपीक लावायचे कसे, पुन्हा कर्ज घेऊन धानपिक लावून कर्जबाजारी व्हायचे का, कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत रक्कम द्यावी.- भुपेंद्र पवनकर, शेतकरी देव्हाडा.
कारखान्यात आठ कोटी रूपयांची साखर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:34 PM
भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये किलोग्रॅम आहे.
ठळक मुद्देआठ हजार शेतकऱ्यांचे आठ कोटी रूपये थकीत :साखरेचे दर वधारल्याने कारखान्यातून साखर विक्री बंद