शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

गांधी सागर तलाव समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 10:03 PM

तुमसर शहरातील प्राचीन गांधी सागर तलावाच्या सभोवतली मोठ्या प्रमाणात शहरासह अन्य भागातील केर केचरा फेकला जात आहे. त्यामुळे तलाव बुजविण्याचा प्रयत्न तर नगर पालिका करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

ठळक मुद्देकेरकचऱ्याने सौंदर्य बाधित : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरातील प्राचीन गांधी सागर तलावाच्या सभोवतली मोठ्या प्रमाणात शहरासह अन्य भागातील केर केचरा फेकला जात आहे. त्यामुळे तलाव बुजविण्याचा प्रयत्न तर नगर पालिका करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. तलावाचा जवळपास २५ मीटर भाग बुजविण्यात आलेला आहे. जलस्तरात वाढ व्हावी त्याकरीता या तलावातील गाळ व पसरलेली घान स्वच्छ करुन आवर कुंपन घालण्याची मागणी करीत मुख्याधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. तत्काळ तलावाची स्वच्छता न केल्यास तोच कचरा नगरपरिषदेत घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे.गांधी सागर तलावामुळे तेथील राहत असलेल्या नागरिकांचा विहिरींना मुबलक प्रमाणात पाण्याची पातळी असते. परिसरात तलावातील जल साठा उपलब्ध असल्याने पाण्याची समस्या राहत नाही.तलावामध्ये केर कचरा घातल्यामुळे तलावाच्या सौंदर्य ही बाब दुरच!, गाळ साचल्यामुळे शहरातील जलस्त्रोतांची पाणी पातळी अत्यंत कमी होत आहे.एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात प्रयत्नशिल आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अन थेंब अडवायचा, साठवणूक करायची व त्याच ठिकाणी जमिनीत मुरवायचा या करिता शासन कटिबद्ध आहे. परंतु तुमसर शहरातील नगर परिषदेचा अखत्यारीतील गांधी सागर तलाव याला अपवाद ठरत आहे. पालिका पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. सदर प्रकरणामध्ये तुमसर नगर परिषद जवाबदार आहे.राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार या योजनेचा उद्देश भूगभार्तील जलस्त्रोत स्तर वाढविणे, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे, पिण्याचा पाणी नगरवासीयांना पुरवठा करणे व उन्हाळ्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करणे हे समाज हिताचे व लोककल्याणकारी हित जोपासणे हे नगर पालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु तुमसर नगर पालिका याला अपवाद आहे.सदर गांधी सागर तलाव स्वत नगर पालिका भूजवित आहे. त्यामुळे भविष्यात गांधी सागर तलाव नामशेष होईल व तिथे फक्त कचºयाचे ढिगारे राहतील, यात शंका नाही.गांधी सागर तलावाचे सौंदर्यीकरण करून त्याला सरक्षीत तार कुंपण करावे. या मागणीची दखल न घेतल्यासह शिवसेना पदाधिकारी सदर गांधी सागर तलावाचा अवतीभवती असलेला केर कचरा उचलून नगर पालिकेमध्ये आणून घालेल याची संवेदनशीलपणे व गांभीयार्ने दखल नगर परिषदने घ्यावी, असा इशारा निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, युवासेनेचे मनोज चौबे यांनी दिला.निवेदन देते वेळी संजू डाहाके, उपशहर प्रमुख कैलाश जलवाने, विभाग प्रमुख हितेश बबवाईक, मनीष करंभे, प्रशांत साठवने, किशोर बिसने, सुमित बडवाईक, धीरज बालपांडे, पवन खवास, नितेश वाडीभस्मे, सागर मिश्रा, नीलेश पाटिल, ईश्वर भोयर सह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.