शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 3:17 PM

रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. असाच एक प्रयोग पवनारा येथील शेतकऱ्याने केला आहे.

ठळक मुद्देपवनारात प्रयोग : शेतात केली मिर्चीची धुणी

भंडारा : रानडुकरांच्या हैदोसाने मातीमोल होत असलेले धान पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नवीन आयडिया शोधून काढली. रानडुकरे पळवण्यासाठी चक्क शेतात मिरचीची धुणी करून नुकसानीवर मात करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.

तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. जो सांगेल तसे शेतकरी करतो, परंतु अजूनही यश आले नाही.

यावर तुमसर तालुक्यातील पवनारा येथील शेतकऱ्याने एक उपाय शोधून काढला. त्याने सुतळीचा पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्यावर जळालेला ऑईल घालून लोखंडी सळाखीला गुंडाळून बांधून दिले. सायंकाळी ६ च्या सुमारास शेतावरील धुऱ्यावर ते उभे करून आग लावली. यामुळे निघणाऱ्या धुरात आईलची दुर्गंधी व मिरच्यामुळे रानडुकराला खेसखेसी होईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही, आणि झालेही तसेच. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

वन्य प्राणी रानडुक्कर जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतो. त्याला दूरवरून आलेली पिके कोणत्या शेतात आहे याचा गंध येतो. तेथे जाऊन नासाडी करतो. या दुर्गंधी व खेसखेसीने कदाचित रानडुक्कर येणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहे. हा प्रयोग चार दिवसाच्या अंतराने करावा असेही सांगितले. या प्रयोगाकडे गावतील इतर शेतकरी लक्ष देऊन आहेत, जेणेकरून हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही शेतकरी आपल्या शेतात करणार असल्याचे सांगण्यात आले.

अगोदरच शेतकरी धानपिकावर किडीचा प्रादुर्भावामुळे त्रस्त झाला आहे. गाद, खोडकिडा यासह अन्य रोगाने पीक ग्रासले. आता अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापणी योग्य आले. त्यातही रानडुकरे नासाडी करतात. वनविभागात नुकसानभरपाई मागितली तर तुटपुंजी मदत मिळताे. त्याकरिताही नानाविध कागदपत्रे व लागणारा अवाढव्य खर्च म्हणून वनविभागाला नुकसान भरपाई मागितली नाही ते बरे, असे बरेच शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी