शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:56 AM

भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देराजेदहेगावचा पाणी प्रश्न : पालकमंत्री व आमदार, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर राजेदहेगाव आहे. तेथील पाणी प्रश्नासाठी गावकरी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष सुरु आहे. सदर पाणी प्रश्न कसा सुटेल याची गावकरी प्रतीक्षा करीत आहे. या प्रश्नावरून ग्रामपंचायतही हतबल झालेली दिसत आहे. गावकºयांपुढे ग्रामपंचायतची एकही चालत नाही. परिणामी ग्रामपंचायत कामकाज ठप्प झालेले दिसून येते. दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी नारायण ढोबळे यांची राजेदहेगाव इंदिरानगर पांदन रस्त्यालगत गट क्रमांक १८३ मध्ये उन्हाळ्यात १७ बोअर खोदले होते. त्यातील एकाही बोअरला पाणी लागले नाही. दरम्यान दोन ते तीन महिन्यापूर्वी १८ वी बोअर १५६ फुट खोल खोदली. त्यावेळी तीन इंच पाणी लागले होते. मुबलक पाणी लागल्याने ग्रामपंचायत कमेटी व काही गैरकायद्याच्या मंडळींनी विंधन विहिर बंद पाडण्याचे षडयंत्र रचले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही गावाला ५० वर्षापासून हिरेखण यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. त्यातही राजकीय असामाजिक तत्वांनी व्यत्यय आणलेला आहे.ग्रामपंचायत विंधन विहिर गाव फिडरवर असल्याने २४ तास विद्युत पुरवठा सुरु असतो. गावातील पाण्याची टाकी ग्रामपंचायतच्या विंधन विहिरीद्वारे ९ ते १० तासात पूर्ण भरते. मात्र गावातील काही असामाजिक लोकांनी सरपंचास सोबत घेऊन ग्रामपंचायत विंधन विहिर बंद केले. त्याला कुलूप लावून गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.प्रशासनाने पडताळणी केल्यास यातील सत्य समोर येईल. दरम्यान विंधन विहिरीला गावातील एका राजकीय पुढाºयाद्वारे नुकसान करणार या आशयाचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना दिले आहे. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोअर वेलला कुलुप असल्याने गावकºयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ही समस्या सोडविण्याची गरज आहे. अन्याथा गावात असंतोष निर्माण होऊन शांतता भंग पावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी