शिवसेनेचा महामार्गावर ‘रास्ता रोको’ : साकोलीत रस्त्यावर दूध फेकले, पवनीत कांदे तर लाखनीत भाजीपाला फेकून निदर्शनेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र बंदच्या शेतकरी संपाला पाठिंबा देत शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी आमदार नरेंद्र भोंडेकर व जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर यांच्या नेतृत्वात महामार्गावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.सोमवारला त्रिमूर्ती चौकात शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी नारेबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, यासाठी आंदोलनकर्त्यांनी महामार्ग अडविला. रस्त्यावर भाजीपाला फेकण्यात आला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता दिसताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. आंदोलनात माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा उपप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, उपसभापती ललीत बोंद्रे, शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे, मुकेश थोटे, अमित दलाल, आकाश खरोले, संजय दमाहे, आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर, प्रविण मेहर, चैतराम सेलोकर, प्रमोद पतनकर, सुरज निंबार्ते, शुभम ठवकर, सचिन मेश्राम, राजु निंबार्ते, विजय भुरे, निलेश जनबंधू आदी कार्यकर्ते सहभागी होते.साकोलीत रस्त्यावर फेकले दूध व भाजीपालासाकोली : महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला पाठिंबा देत साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून भाजपा सरकारविरूद्ध निदर्शने केली. मागील तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला.या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनाला पाठींबा दर्शवित साकोली तहसिल कार्यालयासमोर सभा घेऊन शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी रस्त्यावर भाजीपाला व दूध फेकून निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे डॉ.अजय तुमसरे, नंदु समरीत, माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, राष्ट्रवादीचे अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, शैलेश गणवीर, सुरेशसिंह बघेल, विराचे राकेश भाष्कर, शिवसेनेचे नरेश करंजेकर, विष्णु रणदिवे, प्रकाश करंजेकर, रामचंद्र कोहळे, अंगराज समरीत, रामु लांजेवार, डॉ. अनिल शेंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लाखनीलाखनी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लाखनी बाजारपेठेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, न.पं. उपाध्यक्ष धनु व्यास, उर्मिला आगाशे यांच्या नेतृत्वात महामार्गावर दूध, भाजीपाला फेकून निदर्शने करण्यात आली. यावेळी ओबीसी सेलचे नागेश वाघाये,दिनेश निर्वाण, विनोद आगलावे, प्रशांत चचाने, गवळी, सुभाष खंडाते, गोपाल गायधनी, सुनील चाफळे, मोरेश्वर दोनोडे, आकाश गहरवार, शैलेश गायधनी, विजय चाचेरे कार्यकर्ते सहभागी होते.आझाद शेतकरी संघटनापवनी : आझाद शेतकरी संघटना तर्फे सिंदपूरी टी पॉर्इंट येथे शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी कांदे फेकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आजाद शेतकरी संघटनाचे अध्यक्ष किशोर पंचभाई, जितू नखाते, प्रशांत भुते, प्रकाश पंचभाई, खेमचंद बावणकर, शंकर काटेखाये, लीलाधर मेंढवाडे, अमोल उराडे, सुरेश ईखार, अजय मेंगरे, राजू भूरे, राहुल काटेखाये, दूधराम बावणकर, किशोर भूरे, मंगेश नागरीकर, कैलाश सेलोकर, प्रदीप वाडीभस्मे, मंगेश बोरकर व परिसरातील शेतकरी सहभागी होते.भाकप-किसान सभाभंडारा : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन भाकपचे सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे, माणिक कुकडकर, गोपाल वैद्य, योगराज ताईतकर, गजानन पाचे, मंगेश माटे, अनिल कुरंजेकर, देविदास कान्हेकर यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलनाची जिल्ह्यातही धग
By admin | Published: June 06, 2017 12:17 AM