शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

उपोषणकर्ते शेतकरी रुग्णालयात दाखल

By admin | Published: August 20, 2016 12:18 AM

सोळा तास भारनियमाच्या विरोधात विजवितरण कार्यालयासमोर साकोली येथे शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे.

उपोषण सुरुच : एकही अधिकारी वा लोकप्रतिनिधी भेट दिली नाहीसाकोली : सोळा तास भारनियमाच्या विरोधात विजवितरण कार्यालयासमोर साकोली येथे शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असुन दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले असली या उपोषणमंडपाला एकाही अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधींनी साधी भेटही दिली नाही. दरम्यान अंताराम खोटेले (७३) रा. कुंभली व प्रकाश शिवणकर (५२) रा. पळसगाव अशी रुग्णालयात दाखल केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. या दरम्यान या शेतकऱ्यांनी उर्जामंत्री, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बाळा काशिवार, विज वितरण कंपनीचे अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भारनियमन बंद करण्याची मागणी केली. मात्र यावर तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी चक्क विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरच आधी धरणे आंदोलन व आता आमरण उपोषणाला सुरवात केली. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. या आंदोलनात अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरिभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, रामदास कापगते, बाबुराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे, यशवंत ब्राम्हणकर, मारोती कापगते या शेतकऱ्यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)शासनाची काढणार अंत्ययात्रा चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाचे व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी उद्या २० ला ११ वाजता शेतकरी विरोधी शासनाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने अविनाश ब्राम्हणकर यांनी केले आहे. अंत्ययात्रा मोर्च्याची उद्या दि. २० ला निघणाऱ्या अंत्ययात्रा मोर्च्यासाठी लागणारी तिरडी, वाजा व इतर साहित्याची आजच तयारी करण्यात आली असून आज विज कार्यालयासमोर दिवसभर वाजा वाजवुन आंदोलन सुरु होता.आंदोलनात शेतकऱ्यांची गर्दीसाकोली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांची अफाट गर्दी असुन दररोज हजारो शेतकरी या उपोषण मंडपाला भेट देतात व सायंकाळी परत गावाला जातात.