शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

शेतकरी सुखावला! दहा दिवसांनंतर वरुणराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:23 AM

भंडारा : तब्बल दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ...

भंडारा : तब्बल दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, धानपिकाला जीवदान मिळाले आहे. आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धानाच्या नर्सरीत पेरणी केली होती. पऱ्हे रोवणी योग्य झाले होते; परंतु दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नर्सरीच्या जमिनीला तडे जात होते. नर्सरीतील कोवळे पऱ्हे पिवळे पडू लागले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अशातच बुधवारी सायंकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले. रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून दमदार पावसाला प्रारंभ झाला. भंडारा शहरात पहाटेपासून पाऊस बरसत होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत पाऊस कोसळला. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला.

तुमसर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी रिमझिम पाऊस बरसला होता. गुरुवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पवनारा, चिचोली, बघेडा, नाकाडोंगरी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. मोहाडीत विजेच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे धानपऱ्ह्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ढगाळ वातावरणामुळे मोहाडीत अंधार पसरल्यासारखे दिसत होते. वीज पुरवठाही खंडित झाला होता. उसर्रा येथेही दमदार पावसाने हजेरी लावली. वरठी परिसरात पावसाने हजेरी लावताच विद्युत पुरवठा खंडित झाला. आंधळगाव परिसरात पहाटे ४ वाजतापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. आर्द्रा नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. जांब, लोहारा परिसरात सकाळपासूनच रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी सुखावले होते.

साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात सकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता. ठाणा जवाहरनगर मार्गावर शुकशुकाट दिसत होता. पहेला परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांवरील संकट टळले. पवनी तालुक्यातही सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आसगाव (चौ.) परिसरात धानाच्या बांध्या पावसाने पूर्णत: भरल्या होत्या. पवनी-आसगाव मार्गावरील माती वाहून गेल्याने दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. अड्याळ येथे सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे आता पऱ्ह्यांना जीवदान मिळाले. शहापूर परिसरात पिवळे पडत असलेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले. करडी परिसरात पहाटे २.३० वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. पाऊस बरसताच शेतकऱ्यांनी सकाळपासूनच रोवणीला सुरुवात केली.

बाॅक्स

लाखांदूरमध्ये अनेक घरांत शिरले पाणी

लाखांदूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. सखल भागातील घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तालुक्यात आतापर्यंत ३ हजार २८१ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश आहे.

बाॅक्स

पारडी येथे वीज कोसळून दोन म्हशी ठार

मोहाडी तालुक्यातील पारडी येथे गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन म्हशी ठार झाल्या. मोहाडी तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळला. शेतात चरत असलेल्या दोन म्हशींवर अचानक वीज कोसळल्याने दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या. शेतकऱ्याचे यामुळे मोठे नुकसान झाले.

बाॅक्स

जिल्ह्यात आतापर्यंत ३१९ मिमी पाऊस

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१९.६ मिमी पावसाची नोंद झाली, तर गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसांपासून पावसाने खंड दिला असला तरी जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै यादरम्यान कोसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १०३ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासांत भंडारा ४.९ मिमी, मोहाडी ४९.४ मिमी, तुमसर १३.२ मिमी, पवनी १.६ मिमी, साकोली २७.६ मिमी, लाखांदूर ७.१ मिमी आणि लाखनी तालुक्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बाॅक्स

रोवणीच्या कामाला वेग

जिल्ह्यात दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने रोवणीचे काम खोळंबले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून बरसलेल्या दमदार पावसाने आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५ हजार ८३२ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धानाचे क्षेत्र १ लाख ८३ हजार २५ हेक्टर आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने केवळ २ हजार हेक्टरवरच रोवणी झाली होती. आता पाऊस कोसळल्याने या रोवणीला वेग येणार आहे.

बाॅक्स

बांध्या भरल्या तुडुंब

बुधवारपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुवारी वरुणराजाने मोठा दिलासा दिला. सुकलेल्या बांध्या पावसाने तुडुंब भरल्या. जिल्ह्यात शेतशिवारातील बांध्या पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र सर्वत्र होते. अनेक शेतकऱ्यांनी बांध्या फोडून अतिरिक्त पाणी बाहेर काढले. या दमदार पावसाने अनेक ठिकाणच्या नर्सरीतील पऱ्ह्यांनाही फटका बसला.