लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : खरबी-खराडी परिसरातील शेतशिवारात गत पंधरा दिवसांपासून रानडुकरांनी शेतकºयांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. खरबी, खराडी परिसरात रानडुकरांनी हैदोस घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खरबी परिसरातील शेतकरी, महिला मजूर रानडुकरांचा दहशतीत जीवन जगत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शेतशिवारात कामानिमित्त शेतात जाताना शेतकरी व महिला मजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रोवणीला उशीर झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकºयांनी आपल्या शेतात धानाबरोबर, तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. सध्या शेतकºयांचे सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले आहे.रानडुकरांचे कळप दररोज पिकाचे नुकसा करीत आहेत. रानडुकराने हल्ला करण्याच्या भितीने शेतकरी शेतात काम करत असताना आपला जीव मुठीत ठेऊन कार्य करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे याबद्दलची तक्रार कृषी साहाय्यक रेणूका दराडे यांच्याकडे केली आहे. वनविभागाचे वनरक्षक एस. एम. रामटेके, तलाठी सोळंकी यांनी शेतकºयांच्या समस्येची त्वरित दखल घेत सुकमनी साकोरे, धावडे, खराडीचे धनराज थोटे यांच्या शेतावर जाऊन पिकाची पाहणी करून शासनस्तरावर याची दखल घेत मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. वनविभागाचे वनरक्षक एस. एम. रामटेके यांनी शेतकºयांना या प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी दाट झुडूपाच्या ठिकाणी रानडुकरे वास्तव्य करीत असल्याने शेतकºयांनी अशा ठिकाणापासून एकटे असताना स्वत:चा बचाव करण्यास सांगितले.ज्या शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकºयांनी वनविभाग भंडारा यांच्याशी संपर्क साधावा. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन त्या शेतकºयांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला जाईल.-एस. एम. रामटेके, वनरक्षक, भंडाराखरबी-खराडी शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून प्राप्त झाल्या आहेत. घटनाचे गांभीर्य राखुन वनविभागाच्या मदतीने शेतकºयांची दखल घेण्यात येईल.- रेणुका दराडे, कृषी सहायक
रानडुकरांमुळे शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:20 PM
खरबी-खराडी परिसरातील शेतशिवारात गत पंधरा दिवसांपासून रानडुकरांनी शेतकºयांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत.
ठळक मुद्देखरबी परिसरात दहशत : शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान