तहसीलदारांची मध्यस्थी : धान मोजणी रखडली
लाखनी : धान उत्पादक शेतकऱ्यांची खरीप धान मोजनी रखडल्याने सालेभाटा व परिसरातील शेतकऱ्यांनी बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेद्वारे मंगळवारी सकाळी ११ वाजतापासून धरणे दिले. आंदोलनस्थळी तहसीलदार मल्लिक वीरानी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून १२ फेब्रुवारीपासून धान मोजणी सुरू करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात सिंदीपार, मोरगाव, मासालमेटा, निलागोंदी ,केसलवाडा, परसोडी, सालेभाटा, राजेगाव आदी गावातील शेतकरी जमा झाले होते. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर राहांगडाले, शेतकरी संघटनेचे मनोज पटले, सुरेश बोपचे, सुनील पटले, प्रदीप राहांगडाले, संजय राहांगडाले, हेमचंद्र बोपचे, तेजलाल पटले, सुधाकर हटवार, धनपाल बोपचे, कैलाश भगत, मुनीश्वर राहांगडाले मासलमेटा येथील सरपंच प्रभाकर पटले, रामभाऊ येळेकर, अमूत टेंभुर्णे, नंदकुमार जांभुळकर,विठ्ठल पटले, सतीश बिसेन, रेवता पटले, पपिता दिघोरे, सेवन दिघोरे, अमरनाथ पटले आदी पदाधिकारी उपस्थित होते.