लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामीनाथन आयोग, स्वतंत्र विदर्भ या गोष्टी केंद्रबिंदू होत्या. परंतु पाहाता पहाता हे सरकार केव्हा आॅनलाईन झाले हा विचार करण्याची गरज आहे. मात्र या सरकारचे दिवस आता भरले. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथील निवडणूकीचा आपल्या बाजुने लागल्यर. ही आपल्या विजयाची नांदी आहे. म्हणुन शेतकरी बांधवांनो, आता संयम ठेवा. कारण आत्महत्या करण्याचे दिवस संपले, असे प्रतिपादन काँग्रेसचे शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.चप्राड येथे भव्य लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून झालेल्या अनेक विकास कामांचे लोकार्पण व शेतकरी मेळावा म्हणून रमेश डोंगरे व चप्राड ग्रामवासी यांच्या प्रयत्नातून आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, जेसा मोटवानी, सभापती मंगला बगमारे, मधुकर लिचडे, जि.प.सदस्या शुध्दमता नंदागवळी, जि.प.सदस्य प्रदिप बुराडे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, सेवादल अध्यक्ष कैलास भगत, जि.प.सदस्य दिपक मेंढे, सरपंच उत्तम भागडकर, सरपंचा कुसुम दिघोरे, उपसरपंच गोपाल घाटेकर आदीउपस्थित होते.पटोले म्हणाले, गत चार वर्षांत यांना राम आठवला नाही किंवा हनुमान आठवला नाही. परंतु आता निवडणुक जवळ येताच यांनी मंदिर वही बनायेंगे व भगवंताचे कास्ट सर्टीफिकेट काढण्याचे काम यांनी सुरू केले आहे, निवडणूक जिंकण्यासाठी अनेक खोटे आश्वासने देऊन टाकली आणि आता जनता यांची कानउघडणी करीत आहे तेव्हा सांगतात की ते सर्व जुमले होते.कार्यक्रमाचे संचालन शेख सर यांनी तर, आभार ओमप्रकाश भुते यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास ढोरे, राजु सोंदरकर, सोपान ढोरे, ज्ञानेश्वर सावलावार, गिरधर बगमारे, राजेंद्र रामटेके, दिलीप वासनिक, प्रभाकर राऊत, नंदलाल ढोरे, महादेव शेंडे, विलास करंडे आदींनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करायचे दिवस संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:56 PM
विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामीनाथन आयोग, स्वतंत्र विदर्भ या गोष्टी केंद्रबिंदू होत्या.
ठळक मुद्देनाना पटोले : चप्राड येथे शेतकरी मेळावा व भव्य लोकार्पण सोहळा