शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

शेतात विहीर नको; अनुदानावर बोअर द्या : शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 4:32 PM

भूजलसाठा खोलवर : कमी जागा अन् कमी खर्चातील बोअरला पसंती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. जलपुनर्भरण प्रक्रिया व पर्याप्त पाणी अडविणे व जिरविण्याअभावी भूजलसाठा कमालीने खालावला आहे. गावातील व शेतशिवारातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शासनाकडून विहिरींचे खोदकामासाठी अनुदान दिले जाते. परंतु, खोदकामानंतर विहिरींना पर्याप्त पाणीच लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून विहीर नको, साहेब अनुदानावर बोअर द्या, अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना शेतातील सिंचनासाठी धडक सिंचन विहीर व रोहयोंतर्गत सिंचन विहीर बांधकामासाठी चार लाखापर्यंत अनुदान दिले जाते. मात्र, विहीर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. सिमेंट, लोखंड व इतर वस्तूंचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहेत. खोदकाम करताना दगड लागल्यास विहिरीचे काम अर्धवट पडते. शिवाय उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडून निरुपयोगी ठरतात. त्यामुळे विहीर असूनही शेतात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतात विहिरी बांधल्या, मात्र काही विहिरीला पाणी लागले, तर काही ठिकाणी विहिरी खोदताना जमिनीत दगड लागल्याने अर्धवटठेवाव्या लागल्या. काहींना विहीर ३० ते ३५ फूट खोदूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी लागले नाही. त्यामुळे शेतात विहीर खोदूनही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातून बोअरचे खोदकाम करण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे

बारमाही सिंचन होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे पडतात. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, सिंचनाच्या सुविधेचा दुष्काळ असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. शेतकऱ्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी व शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी राज्य शासनाच्यावतीने सिंचन विहिरींसाठी अनुदान दिले जाते. 

अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतात विहिरी बांधल्या, मात्र काही विहिरीला पाणी लागले, तर काही ठिकाणी विहिरी खोदताना जमिनीत दगड लागल्याने अर्धवटठेवाव्या लागल्या. काहींना विहीर ३० ते ३५ फूट खोदूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी लागले नाही. त्यामुळे शेतात विहीर खोदूनही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातून बोअरचे खोदकाम करण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे

विहीर खोदकामासाठी मजूर सापडेनातविहीर खोदकामासाठी शेतकऱ्यांना वेळ, पैसा व दगदग सोसावी लागते. शासनाने विहिरींसाठी अनुदान दिल्यास शासनाचे पैसे वाचतील आणि बोअरद्वारे मुबलक सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, बोअर मारण्यासाठी वेळही लागत नाही. त्यातच अलीकडे मजूर सापडत नसल्याने विहिरीचे खोदकाम करणे फार कठीण झाले आहे.

शेतशिवारात एक फूट व्यासाचा बोअर मारण्यासाठी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च येतो. जिल्ह्यात विहिरीपेक्षा बोअरचे खोदकाम करणे सोयीचे आहे. बोअरची पाणीपातळी खोल राहत असल्याने उन्हाळ्यातही पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना बोअरच्या खोदकामासाठी अनुदानावर योजना अंमलात आणावी.- महादेव फुसे, शेतकरी. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रbhandara-acभंडाराfarmingशेती